AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi Watch : नरेंद्र मोदींच्या घड्याळाची जगात चर्चा, किंमत तब्बल…. डायलमध्ये असं काही दिसलं की फोटो व्हायरल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटावरील एका घड्याळाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या घड्याळाचे काही फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. घट्याळाची किंमत तर चकित करणारी आहे.

Narendra Modi Watch : नरेंद्र मोदींच्या घड्याळाची जगात चर्चा, किंमत तब्बल.... डायलमध्ये असं काही दिसलं की फोटो व्हायरल!
pm narendra modi watch
| Updated on: Nov 19, 2025 | 5:00 PM
Share

Narendra Modi Watch : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांच्या एका-एका शब्दाला फार महत्त्व आहे. मोदी यांनी एखादे विधान केले तर त्याचे अनेक अर्थ काढले जातात. देशाचे प्रमुख असल्याकारणाने त्यांच्या पेहरावाचीही तेवढीच चर्चा होते. याआधी नरेंद्र मोदी हे नाव असलेला बंद गळ्याचा कोट परिधान केल्यानंतर मोदी यांच्यावर मोठी टीका झाली होती. आता त्यांच्या हातात असलेल्या एका घड्याळाची सगळीकडे चर्चा होत आहे. या घड्याळाचे डायल, त्यावरची डिझाईन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

तीन महिन्यांत वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसले घड्याळ

नरेंद्र मोदी यांच्या हातात दिसलेल्या एका घड्याळाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. हे घड्याळ अनेक अर्थांनी खास आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोदींच्या या घड्याळाच्या डायलमध्ये 1947 सालातील1 रुपयाचे नाणे आहे. मोदींनी हे घड्याळ सप्टेंबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या काळात अनेक कार्यक्रांत घातलेले आहे. याच घड्याळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

घड्याळात आहे खरेखुरे नाणे

मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या हातातील हे घड्याळ जयपूर वॉच कंपनीने तयार केलेले आहे. या घड्याळाचे नाव Roman Baagh असे आहे. या घड्याळात 1947 साली तयार करण्यात आलेले एक खरेखुरे नाणे आहे. या नाण्यावर भारतातील वॉकिंग टायगर आहे.

घड्याळाची किंमत किती?

उपलब्ध माहितीनुसार Roman Baagh या घड्याळाची किंमत साधारण 5 हजार ते 60 हजार रुपये आहे. हे एक महागडे घड्याळ असल्याचे बोले जाते. जयपूर वॉच कंपनीकडून हे घड्याळ तयार करण्यात आले आहे. ही कंपनी गौरव मेहता यांनी उभारलेली आहे. जुने नाणे, टपालाचे तिकीट, पारंपरिक डिझाईन्स यांच्या मदतीने या कंपनीकडून घड्याळे तयार केले जातात. दरम्यान, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2015 मध्ये एक कोट परिधान केला होता. या कोटावर नरेंद्र मोदी असे लिहलेल्या पट्ट्या होत्या. याच कोटवरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मोदींच्या अंगातील हा कोट तब्बल 10 लाखांचा आहे, अशी टीका तेव्हा खासदार राहुल गांधी यांनी केली होती. असे असताना आता मोदींच्या नव्या घडीची सगळीकडे चर्चा होत आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ