National Film Awards: मोठा निर्णय! दिल्लीत नाही तर गुजरातमध्ये होणार ७२वा नॅशनल फिल्म अवॉर्ड, कारण तरी काय?

National Film Awards:यंदाचा ७२वा नॅशनल फिल्म अवॉर्ड दिल्लीत होणार नाही. २०२६ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये होणार आहे. मात्र, यापूर्वीही ही परंपरा तुटलेली आहे. चला, संपूर्ण तपशील सांगतो.

National Film Awards: मोठा निर्णय! दिल्लीत नाही तर गुजरातमध्ये होणार ७२वा नॅशनल फिल्म अवॉर्ड, कारण तरी काय?
राष्ट्रीय पुरस्कार सोहळा
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 08, 2026 | 9:52 AM

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा २०२६बाबत मोठी माहिती समोर आली आहे. दरवर्षी दिल्लीत होणारा हा पुरस्कार सोहळा यंदा गुजरातमध्ये पार पडणार आहे. ७२ वर्षांत पहिल्यांदाच हा सोहळा गुजरातमध्ये होत आहे असे नाही. यापूर्वीही काही वेळा तो दिल्ली ऐवजी इतर राज्यांमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण यामागचे कारण तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया…

यापूर्वी १९७१ मध्ये ही परंपरा मोडून चेन्नईमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. आता २०२६ मध्ये होणाऱ्या या सोहळ्याचे आयोजन गुजरातच्या केवडिया येथे केले जाणार आहे. तिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ सप्टेंबरला पुरस्कार प्रदान करतील. ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जुलैमध्ये जाहीर झालेल्या नॅशनल अवॉर्ड पुरस्कारांचा ७२वा वितरण सोहळा दरवर्षीच्या परंपरेपेक्षा वेगळा असेल. मात्र, अशी उदाहरणेही आहेत जेव्हा सोहळा दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आला होता. १७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन १९७१ मध्ये चेन्नईमध्ये करण्यात आले होते.

नॅशनल अवॉर्ड विनर्सची यादी

नॅशनल अवॉर्ड विनर्सची यादी आधीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ‘आर्टिकल ३७०’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून निवडण्यात आले आहे, तर त्या सिनेमातील मुख्य अभिनेत्री यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणार आहे. मल्याळम सुपरस्टार ममूटी आणि बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन यांना अनुक्रमे ‘ब्रह्मयुगम’ आणि ‘चंदू चॅम्पियन’मधील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संयुक्तपणे म्हणजे एकत्र दिला जाईल.

तसेच अभिनेता व चित्रपट निर्माते रणदीप हुड्डा यांना विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारित चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’साठी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. तेलुगु चित्रपट ‘कल्कि २८९८ एडी’ला ‘संपूर्ण मनोरंजन असलेली’ सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळणार आहे. यासोबतच अरुण माथेश्वरन दिग्दर्शित आणि धनुष अभिनीत तामिळ चित्रपट ‘कॅप्टन मिलर’ला ‘राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना’ प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून निवडण्यात आले आहे.

केवडियाचे बदललेले नाव

केवडियाचे नाव बदलून एकता नगर करण्यात आले आहे, जिथे सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. ही जगातील सर्वांत उंच प्रतिमा आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या नावाने प्रसिद्ध असलेली ही प्रतिमा ५९७ फूट उंच आहे आणि तिचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us