हे झाड आयुष्यात कधीच घराजवळ लावू नका, असतो सापांचा डेरा, तुमच्याही परिसरात आहे का?

पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भारतात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते, त्याचं कारण म्हणजे पावसाळ्यात सापं हे बिळात नसतात तर ते जमिनीवर येतात, त्यामुळे पावसाळ्यात सापांपासून सतर्क राहणं गरजेचं असतं.

हे झाड आयुष्यात कधीच घराजवळ लावू नका, असतो सापांचा डेरा, तुमच्याही परिसरात आहे का?
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 24, 2026 | 9:28 PM

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, गेले काही दिवस पाऊस नव्हता, मात्र दोन ते तीन दिवसांपासून राज्यात चांगला पाऊस पडत आहे. पावसाळ्यात जसा वीज, वादळ आणि पाणी यांचा धोका असतो, तसाच आणखी देखील एक मोठा धोका असतो, तो म्हणजे सापांचा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी शिरतं, सापांच्या बिळात पाणी शिरल्यामुळे ते बिळात राहु शकत नाहीत, ते जमिनीवर येतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इतर ऋतुच्या तुलनेत तुम्हाला अधिक प्रमाणात साप दिसतात, त्याचं हेच कारण आहे, की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा जमिनीवर जास्त वावर असतो. अशावेळी जर तुमचं दुर्लक्ष झालं किंवा सापांवर पाय पडला तर तुम्हाला सर्पदंशाचा धोका देखील असतो. त्यामुळे पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना किंवा शेतात जाताना नेहमी बुटाचाच वापर करावा, शक्यतो पायात चप्पल घालू नये.

पावसाळ्याच्या दिवसात साप जेव्हा बिळातून बाहेर पडतात, तेव्हा ते आपल्यासाठी अशी जागा शोधातात की ते पूर्णपणे सुरक्षित देखील असेल आणि कोरडी देखील. अशावेळी साप अनेकदा तुमच्या घरात देखील घुसतात. जिथे अंधारी जागा असेल जिथे अडचण असेल अशा ठिकाणी ते लपून बसतात. त्यामुळे घरात पसारा राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

एवढंच नाही तर अशी देखील काही झाडं असतात, ती पावसाळ्यामध्ये सांपाना सुरक्षित निवारा वाटतात. त्यापैकीच एक म्हणजे बांबुचं झाडं. बांबुच्या झाडाचा पाला मोठ्या प्रमाणात खाली गळतो, त्यामुळे शक्यतो या पाल्याखाली असलेली जमीन पावसाच्या पाण्यात भीजत नाही, आणि ती कोरडी राहते. तिथे सापांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते, त्यामुळे साप हे नेहमी अशा झाडांकडे आकर्षित होतात. तसेच साप अनेकदा बांबूच्या झाडांमध्ये जी पोकळी असते, तिचा देखील लपण्यासाठी उपयोग करतात, त्यामुळे कधीही बांबूच्या झाडाजवळ जाताना काळजी घ्यावी. शक्यतो बांबूचं झाड हे शेतात लावावं किंवा घरापासून थोडं दूर लावावं, घरात हे झाड लावू नये.  तसेच जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांत कुठे साप दिसलाच तर त्याची माहिती तातडीने सर्पमित्रांना द्यावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us