Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

Abhijeet Dipke : दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असलेले अभिजीत दीपके यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा
Abhijeet Dipke
| Updated on: Jul 18, 2026 | 10:12 AM

दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असलेले अभिजीत दीपके यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. आजपासून मी आमरण उपोषण सुरु करत आहे तसच 20 जुलैला संसदेपर्यंत मार्च काढणार असं अभिजीत दीपके यांनी जाहीर केलं आहे. आज सकाळी दिल्ली पोलिसांनी दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली पोलिसांनी सकाळी ही कारवाई केली. त्यावेळी आंदोलन स्थळी गोंधळ उडाला. अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन ताब्यात घेतलं असा आरोप सोशल माीडियावर पोस्ट करुन केला.

नीट (NEET)परीक्षेचा पेपर फुटला. देशातील लाखो विद्यार्थ्यांना यामुळे त्रास सहन करावा लागला. या पेपर लीक प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवावं व त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक 28 जूनपासून आमरण उपोषणाला बसले होते. अभिजीत दीपके म्हणाले की, “मी आजपासून आमरण उपोषण सुरु करत आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, मागे हटू नका. ही चळवळ आणखी वाढणार आहे. त्यांनी मोठी चूक केली आहे. मी प्रत्येकाला विनंती करतो की, तुम्ही जंतर-मंतरवर या. इथून आपली चळवळ सुरु राहिलं. ठरल्यानुसार 20 जुलै रोजी आपण संसदेवर जाऊ”

सोनम वांगचूक यांना पाठिंबा वाढत चाललेला

हे आंदोलन सुरु झाल्यापासून अभिजीत दीपके हे सोनम वांगचूक यांच्यासोबत सतत दिसत होते. मागच्या दोन-चार दिवसात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. आजही काही नेते इथे सोनम वांगचूक यांना भेटण्यासाठी येणार होते. सोनम वांगचूक यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रातून आणि बॉलिवूडमधून पाठिंबा वाढत चालला होता.

Follow Us