AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : दिल्ली पोलिसांकडून मला मारहाण, अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप

Abhijeet Dipke : आज सकाळीच दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांकडून ही कारवाई सुरु असताना तिथे मोठा गोंधळ झाल्याच पहायला मिळालं.

Abhijeet Dipke : दिल्ली पोलिसांकडून मला मारहाण, अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप
Abhijeet Dipke
| Updated on: Jul 18, 2026 | 8:39 AM
Share

मागच्या 20 दिवसांपासून दिल्लीत जंतरमंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक उपोषणाला बसले होते. आज सकाळीच दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांकडून ही कारवाई सुरु असताना तिथे मोठा गोंधळ झाल्याच पहायला मिळालं. सोनम वांगचूक यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी असलेले अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असलेले अभिजीत दीपके यांनी गंभीर आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी मला मारहाण करुन ताब्यात घेतलं असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन सुरु झाल्यापासून अभिजीत दीपके हे सोनम वांगचूक यांच्यासोबत सावली सारखे वावरत होते.

मागच्या दोन-चार दिवसात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचूक उपोषण करत होते. पण आज दिल्ली पोलिसांनी दिल्ली हायकोर्टाच्या आदेशावरुन ही कारवाई केली.

28 जूनपासून आमरण उपोषण

सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरुन आंदोलकांना हटवलं. नीट (NEET) सारख्या मोठ्या परीक्षेत झालेल्या पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरुन राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक 28 जूनपासून आमरण उपोषणाला बसले होते. सोनम वांगचूक यांना रुग्णालयाच्या इमर्जन्सी कक्षात दाखल करण्यात आलं आहे. ते पूर्णपणे शुद्धीत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

कोर्टात दाखल झालेली जनहित याचिका

कोर्टाचे आदेश आणि मेडिकल एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार हे पाऊल उचलण्यात आलं असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. सोनम वांगचूक यांची प्रकृती बिघडत चाललेली. त्यांना वैद्यकीय देखभालीची आवश्यकता होती. दिल्ली उच्च न्यायालयात सोनम वांगचूक यांची सुरक्षा आणि प्रकृती स्वास्थासाठी एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने म्हटलेलं की, ‘डॉक्टरांकडून त्यांची नियमित तपासणी करावी आणि डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार आवश्यक पावल उचलावी’

Follow Us
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत