AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतर-मंतरवर मोठा गोंधळ

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतील आहे.

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतर-मंतरवर मोठा गोंधळ
| Updated on: Jul 18, 2026 | 12:15 PM
Share

दिल्लीच्या जंतरमंतरमधून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जंतर-मंतरवर मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे उपोषणस्थळी मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर मागील 20 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले होते. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. मागील 20 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचं जवळपास 20 किलो वजन कमी झालं. यामुळे त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाला.

वांगचूक यांनी शुक्रवारी रात्री शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी 20 जुलै रोजी ‘चलो संसद’च्या आंदोलनाचा नारा दिला होता. ‘देशातील कांद्याच्या किंमतीसाठी सरकारला जबाबदार धरण्यात येते. तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षण व्यवस्थेतील गैरकारभाराविरोधात त्यांनाच जबाबदार धरले पाहिजे. नीट पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या मुद्यांवरून सरकारला जबाबदार धरलं पाहिजे, असं सोनम वांगचुक यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर अनेक संघटनांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. देशभरातून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता. नीट पेपरफुटीवरून सरकारने उत्तर द्यायला पाहिजे, राजकीय पातळीवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जात होती.

दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, कोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. दिल्लीच्या हायकोर्टात सोनम वांगचुक यांच्या तब्येतीवरून एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल करण्यात आल्यानंतर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं होतं की, सरकारी डॉक्टरांनी सोनम वांगचुक यांची नियमितपणे तपासणी करावी. तसेच डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, आवश्यक ती पावले उचलावीत, असे कोर्टाने नमूद केले होते. दुसरीकडे प्रकृती खालावत असतानाही शुक्रवारी रात्री त्यांनी व्हिडिओ शेअर करत 20 जुलैच्या आंदोलनासाठी आवाहन केलं होतं. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा