PM Modi Independence Day 2025 Speech : भारताने कुठल्या प्रोजेक्टसाठी मिशन मोडवर झोकून दिलय, पीएम मोदींनी आज दिली त्याबद्दल महत्त्वाची माहिती

PM Modi Independence Day 2025 Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात सुरु असलेल्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. त्या प्रकल्पासाठी मिशन मोडवर झोकून देऊन काम सुरु आहे. हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट काय आहे? त्याचं महत्त्व काय? हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगितलं.

PM Modi Independence Day 2025 Speech :  भारताने कुठल्या प्रोजेक्टसाठी मिशन मोडवर झोकून दिलय, पीएम मोदींनी आज दिली त्याबद्दल महत्त्वाची माहिती
PM Narendra Modi
| Updated on: Aug 15, 2025 | 9:25 AM

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये सेमीकंडक्टरची गरज लागते. सेमीकंडक्टर उत्पादनात आजच्या तारखेला तैवान आघाडीवर आहे. भारतालाही सेमीकंडक्टर उत्पादनात अग्रेसर करण्याचा मोदी सरकारचा इरादा आहे. त्यासाठी धोरण आखणी, सेमीकंडक्टर उत्पादनाला अनुकूल स्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज 79 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीकंडक्टरच्या मुद्याला छेडलं. “50 वर्षांपूर्वी सेमीकंडक्टरचा विचार सुरु झाला. 50 वर्षांपूर्वी फॅक्टरीचा विचार झाला. तुम्ही ऐकून हैराण व्हाल, आज जो सेमीकंडक्टर सगळ्या जगाची ताकद बनला आहे, 50 वर्षांपूर्वी तो विचार फाईलमध्येच अडकून पडला. सेमीकंडक्टरच्या विचाराची भ्रूण हत्या झाली. आपल्यानंतर अनेक देश सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये एक्सपर्ट बनून जगाला ताकद दाखवत आहेत” असं पीएम मोदी म्हणाले.

“या वर्षाच्या अखेरपर्यंत पहिली मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चीप येईल. आम्ही सेमीकंडक्टर क्षेत्रात मिशन मोडवर काम करत आहोत. भारतात निर्मिती झालेली चीप या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात उपलब्ध होईल” असं पीएम मोदी म्हणाले. “आम्ही भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सौर ऊर्जा, हायड्रोजन, अणवस्त्र क्षेत्रात अनेक पावलं उचलली आहेत. भारताने 2030 च लक्ष्य ठरवलेलं, त्याआधीच स्वच्छ ऊर्जेमध्ये 50 टक्क्याच लक्ष्य गाठलं आहे” असं पीएम मोदी म्हणाले.

देशाच्या स्पेस सेक्टरची स्थिती काय?

“अणूऊर्जा क्षेत्रात अनेक सुधारणा करत आहोत. खासगी क्षेत्रासाठी हे ओपन केलय. शुभांशु शुक्ल अवकाश मोहिम संपवून परतले आहेत. लवकरच ते भारतात परततील” असं पीएम मोदी यांनी सांगितलं. “स्पेस सेक्टरची कमाल प्रत्येक देशवासी पाहत आहे. आपण स्वबळावर मिशन गगनयानची तयारी करत आहोत. आपण आपल्या बळावर स्पेस स्टेशन बनवण्यावर काम करत आहोत. स्पेस सेक्टरमध्ये सुधारणा केल्या आहेत. स्पेस सेक्टरमध्ये आज 300 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. हजारो युवा पूर्ण सामर्थ्याने काम करत आहेत. भारत आज प्रत्येक क्षेत्रात आधुनिक इको सिस्टिम तयार करत आहे” असं पीएम मोदी म्हणाले.

“त्यांनी लाल किल्ल्यावरुन युवा वैज्ञानिक, इंजिनिअर्स आणि युवकांना मेड इन इंडिया फायटर जेटसाठी स्वत:च जेट इंजिन बनवण्याच आवाहन केलं. आपण रिसर्च आणि डेवलपमेंटध्ये अजून ताकद लावावी हे वेळेची मागणी आहे” असं पीएम मोदी म्हणाले.