‘इथे फक्त काँग्रेस नेत्यांची चौकशी होते की इतर कुणालाही कधी बोलवता’, राहुल गांधींनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारले. मग..

| Updated on: Jun 13, 2022 | 7:06 PM

राहुल यांना पाणी देण्यात आले. त्यांना चहा कॉफीही विचारण्यात आली, मात्र त्यांनी नकार दिला. चौकशीत एकदाही त्यांनी मास्क काढला नाही. राहुल यांनी अधिकाऱ्याला नाव आणि पद विचारले.

इथे फक्त काँग्रेस नेत्यांची चौकशी होते की इतर कुणालाही कधी बोलवता, राहुल गांधींनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारले. मग..
Rahul Gandhi in ED office
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीने सुमारे तीन तास चौकशी केली. या काळात त्यांना ईडीने ५० प्रश्न विचारले. मात्र राहुल गांधी यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर ईडी अधिकाऱ्यांना देता आले नाही. राहुल गांधी यांनी चौकशीच्या आधी ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारले की, इथे फक्त काँग्रेस नेत्यांना बालवता, की इतर कुणालाही कधी बोलवता का, या प्रश्नावर ईडी अधिकारी गप्पच झाला, त्या अधिकाऱ्याने या प्रश्नावर काहीही उत्तर दिले नाही. राहुल गांधी यांच्या चौकशीत त्यांनी दिलेल्या उत्तरातून निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे चौकशी लांबली.

ईडीच्या कार्यालयात काय झालं

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर, सुमारे सव्वा ११ च्या सुमारास राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहचले. तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना मोबाईल फोनबाबत विचारणा केली. त्यावर राहुल यांनी तुम्ही चेक करा, ही तुमची ड्युटी आहे, असे सांगितले. मात्र राहुल गांधी यांचा मोबाईल त्यावेळी त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्या हातात त्यांना आलेल्या ईडीच्या समन्सची कॉपी होती.

सुरक्षारक्षकांशी संवादाचा प्रयत्न

त्यानंतर राहुल यांना असिस्टंट डायरेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याकडे चौकशीसाठी नेण्यात आले. यावेळी चालताना राहुल यांनी सुरक्षारक्षकांना नावे विचारली. या ठिकाणी किती दिवसांपासून आहात, प्रत्येकाला अशाच पद्धतीने नेले जाते का, असे प्रश्न राहुल यांनी विचारले. मात्र सुरक्षारक्षक, कर्मचारी हे स्मीतहास्य करीत होते, त्यांनी उत्तरे दिली नाहीत. राहुल गांधी अधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहचल्यावर अधिकारी तिथे न्वहते. त्यानंतर अधिकारी येतायेत, तोपर्यंत बसा, असे राहुल यांना सांगण्यात आले. मात्र अधिकारी येईपरप्यंत राहुल उभेच राहिले. अधिकारी आल्यावर त्यांनी राहुल यांना बसण्यास सांगितले. त्यानंतर मास्क घातलेले राहुल म्हणाले, धन्यवाद, आता ते विचारायचे आहे ते विचारा, मी तयार आहे.

चौकशीत मास्क काढला नाही

राहुल यांना पाणी देण्यात आले. त्यांना चहा कॉफीही विचारण्यात आली, मात्र त्यांनी नकार दिला. चौकशीत एकदाही त्यांनी मास्क काढला नाही. राहुल यांनी अधिकाऱ्याला नाव आणि पद विचारले. त्यावेळी त्यांनी इथे केवळ काँग्रेस नेत्यांची चौकशी होते की, इतर कुणाला तुम्ही कधी बोलवता का, असा प्रश्न विचारला. त्यावर अधिकाऱ्याने उत्तर दिले नाही.

राहुल यांना कोणते प्रश्न?

यंग इंडियात तुमची काय भागिदारी आहे, असे त्यांना विचारण्यात आले. यंग इंडियाचे शेअर्स तुम्ही तुमच्या नावे का केले, असेही त्यांना विचारण्यात आले. यंग इंडियात किती टक्के भागिदारी आहे, हेही त्यांना विचारण्यात आले. तुमच्यासह इतर कुणाचे यात शेअर्स आहेत हेही विचारण्यात आले.

सामान्य आरोपीप्रमाणे राहुल सामोरे गेले

ईडीच्या कार्यालयात राहुल यांना व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आली नाही. एखाद्या सामान्य आरोप्याप्रमाणेच त्यांना ईडी अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले. राहुल देत असलेली उत्तरे कॉम्प्युटरवर बसलेल्या एका कर्मचाऱ्याकडून नोंदवून घेण्यात येत होती. चौकशीनंतर याची एक प्रत राहुल यांनाही देण्यात येणार आहे.