
भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला होता त्यासोबतच भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांची फाळणी झाली होती. या फाळणीमध्ये पंजाब प्रांताला मोठा फटका बसलेला. कारण पंजाबचेच दोन भागात विभाजन झाले होते. पंजाबला प्रांत स्वतंत्र करण्याची मागणी आधीपासूनच म्हणजेच स्वातंत्र्यपुर्व काळातच केली जात होती. भारत स्वतंत्र झाल्यावर पुन्हा एकदा ही मागणी होऊ लागली होती. भारत सरकारने 1953 मध्ये राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना केली होती. पंजाबचं विभाजन करून पंजाबी भाषा बोलणारे आणि पंजाबी न बोलणारे असं विभाजन करण्यात यावं. मात्र आयोगाने पंजाबी वेगळी भाषा नसल्याचे सांगितलं. आयोगाने अकाली दलाच्या मागणीला विरोध केला. त्यानंतर अकाली दलाने एक आंदोलन सुरू केलं याला ‘पंजाबी सूबा’ आंदोलनही बोललं जातं. या आंदोलनामध्ये पंजाब सरकारने वीस हजारांपेक्षा जास्त लोकांना अटक केली गेली होती. इंदिरा गांधी यांनी 1966 मध्ये पंजाब राज्य पुनर्रचना कायदा मंजूर करण्याचा निर्णय घेतला. पंजाब प्रांताचं विभाजन झालं त्यानंतर हरियाणा आण हिमाचल प्रदेश असं विभाजन करण्यात आलं होतं. ...