पाकिस्तानचा पायलट भारतात विमान उडवू शकतो? वाचा नियम काय, स्मित मच्छारच्या प्रकरणात..
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात धक्कादायक घटना घडली. ज्याचा विचारही कोणी केला नाही असे काही या विमानात घडले. ज्याने एकच खळबळ उडाली. भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी जे काही केले त्याचे काैतुक जगभरात होत आहे.

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात धक्कादायक घटना घडली. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी असूनही भारतीय पायलटने हार मानली नाही. FZ1073 दुबईहून तेल अवीवकडे निघाले. या विमानात भारतीय पायलट स्मित मच्छार होते तर ओमानचे पायलट को पायलट होते. विमान त्याच्या ठरलेल्या उंचीवर पोहोचल्यानंतर को पायलटने स्मित यांच्यावर हल्ला चढवला. त्याने विमानाला क्रॅश करण्यासाठी प्रयत्न केली. गंभीर जखमी असतानाही पायलट स्मितने आपत्कालीन कोड पाठवले. तीन वेळा पायलटने हे कोड टाकले. यासोबतच स्मित मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजाही उघडला आणि जोरात आवाज दिला. यानंतर एक प्रवासी कॉकपिटमध्ये आला आणि नक्की काय घडले हे त्याच्या लक्षात आले.
त्यानंतर तात्काळ ओमानच्या पायलटला पकडले. यानंतर गंभीर जखमी असतानाही स्मित मच्छार यांनी विमान सुरक्षित उतरवले. या घटनेने मोठी खळबळ जगात उडाली. या विमानात जवळपास नागरिक हे इस्त्रायली होते. ओमानच्या पायलटला कोणत्याही परिस्थितीमध्ये विमान क्रॅश करायचे होते. त्यात आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, भारतीय एअरलाईन्सचे विमान पाकिस्तानी पायलटला उडवता येतात का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
डीजीसीएच्या (DGCA) नियमांनुसार, एअर इंडिया आणि इंडिगोसारख्या भारतात नोंदणीकृत विमान कंपन्यांना पाकिस्तानी नागरिकांना वैमानिक यासोबतच क्रू मेंबर्स म्हणून नियुक्ती करण्याची परवानगी नाही. मात्र, परदेशी विमान कंपन्यांबाबत परिस्थिती वेगळी आहे. एखादा पाकिस्तानी नागरिक म्हणजे पाकिस्तानी पायलट कतार एअरवेज आंतरराष्ट्रीय विमान कंपनीत वैमानिक म्हणून काम करत असेल तर तो भारतीय क्षेत्राचा वापर करू शकतो.
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या नियमानुसार, ते भारतीय हद्दीचा वापर करू शकतात. परदेशी विमान कंपनीचे विमान भारतात उतरल्यास नागरी उड्डाण प्राधिकरण आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने विहित केलेल्या सुरक्षा तपासण्या व कार्यपद्धतींची अंमलबजावणी केली जाते. उच्च-धोकादायक देशांमधील विमान कर्मचाऱ्यांवर अधिक देखरेख ठेवली जाते. नियोजनाबाबत निर्बंधही घातली जातात. भारतीय हवाई हद्दीचा वापर पाकिस्तानी पायलट करू शकतात.