पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली, डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. पाकिस्तान राहणारे सर्वसामान्य नागरिक दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने हैराण झाले आहे. यानंतर आता पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली असून, एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 149 वर पोहोचले आहे. येत्या काही दिवसात पाकिस्तानी रुपया आणखी खाली जाण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. सध्या पाकिस्तान आर्थिक डबघाईला […]

पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली, डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. पाकिस्तान राहणारे सर्वसामान्य नागरिक दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने हैराण झाले आहे. यानंतर आता पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली असून, एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 149 वर पोहोचले आहे. येत्या काही दिवसात पाकिस्तानी रुपया आणखी खाली जाण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

सध्या पाकिस्तान आर्थिक डबघाईला आलं आहे. पाकिस्तान राहणाऱ्या अनेक लोकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दैनंदिन वापरच्या वस्तूंचे दरही पाकिस्तानात गगनाला भिडले आहे. पाकिस्तानात महागाईचा दर 9.41 टक्क्यांवर पोहोचला आहे.

या कारणामुळे पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात 29 टक्क्याने घट झाली आहे. त्यामुळे एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 149 वर पोहोचले आहे. दरम्यान नेपाळमध्ये मात्र रुपयाचे मूल्य वधारले असून, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 112 वर पोहोचले आहे. त्याशिवाय एका डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयाचे मूल्य 70.23 वर पोहोचले आहे. त्यापाठोपाठ अफगाणिस्तान 79.2, नेपाळ 112, श्रीलंका 176.18 अशी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आहे.

पाकिस्तानी रुपया घटल्याची काही संभाव्य कारणं

पाकिस्तान भारताप्रमाणे खनिज तेल आयात करते. त्याशिवाय पाकिस्तानात दैनंदिन वापरातील वस्तूही आयात केल्या जातात. यामुळे रुपयाचं मूल्य सातत्यानं कमी होत असून महागाईत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आईएमएफ)ने बेलआऊट डील केल्यानंतर पाकिस्तानी रुपयात ऐतिहासिक घसरण झाली आहे. पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील करारातील अटी, शर्ती अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे व्यावसायिक आणि गुंतवणूकदार संभ्रमाव्यस्थेत आहेत. अनेकांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका पाकिस्तानी अर्थव्यस्थेला बसला आहे. पाकिस्तानी रुपयाचे मूल्य सध्या 149 वर पोहोचले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात 29 टक्क्याने घट झाली आहे.

प्रसारमाध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून येत्या अर्थसंकल्पात वीज आणि गॅसच्या किमती वाढवणार आहेत. त्यामुळे आधीच महागाईने कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांचे आणखी हाल होणार आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.