Pariksha Pe Charcha: परीक्षेच्या तणावाला छूमंतर करतील पंतप्रधान मोदींचे हे टिप्स, ‘परिक्षा पे चर्चा’चे तीन महत्वाचे मुद्दे

परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच्या टेन्शनचे मुख्य कारण, एक म्हणजे परीक्षा दिल्यानंतर आपण घरच्यांना सांगतो की, माझा पेपर उत्कृष्ट झाला आहे..

Pariksha Pe Charcha: परीक्षेच्या तणावाला छूमंतर करतील पंतप्रधान मोदींचे हे टिप्स, 'परिक्षा पे चर्चा'चे तीन महत्वाचे मुद्दे
परीक्षा पे चर्चाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 3:55 PM

नवी दिल्ली, पीएम मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये (Pariksha Pe Charcha) विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले, यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न हरियाणा आणि जम्मूच्या विद्यार्थ्यांनीही विचारला होता. हरियाणाच्या पलवल येथील शहीद नायक राजेंद्र सिंह राजकिया मौलिक संस्कृती सिनियर स्कूलमध्ये शिकणारा 12वी विज्ञान प्रवाहाचा विद्यार्थी प्रशांत याने विचारले की, तणावाचा परीक्षेच्या निकालावर कसा परिणाम होतो? दुसरीकडे, जम्मूतील 10 वीच्या निदाहने पीएम मोदींना (PM Modi) विचारले की, जेव्हा आपण कठोर परिश्रम करतो पण फळ मिळत नाही, तेव्हा  तणावातून बाहेर कसे येता येईल? परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कोणते मंत्र दिले ते जाणून घेऊया.

वस्तुस्थितीला सामोरे जा

परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच्या टेन्शनचे मुख्य कारण, एक म्हणजे परीक्षा दिल्यानंतर आपण घरच्यांना सांगतो की, माझा पेपर उत्कृष्ट झाला आहे, मला 90 टक्यांची खात्री आहे, मी खूप चांगले पेपर सोडविले आहेत. असे सांगीतल्याने घरचेही शांत राहतात आणि घरच्यांचा ओरडाच खायचा असेल तर तो महिन्याभरानंतर खाऊ अशी विद्यार्थांची मानसीकता असते.

तुम्ही खरे बोलत आहात आणि तुमचा चांगला निकाल लागणार आहे असे घरच्यांनी गृहीत धरले असते, ते त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगतात की तुम्ही खूप चांगली मेहनत घेतली आहे. खूप अभ्यास केला आहे, पण जेव्हा निकाल 40 टक्के येतो. मग वादळ उभे राहते.

हे सुद्धा वाचा

म्हणून पहिली गोष्ट म्हणजे सत्याला सामोरे जाण्याची सवय सोडू नये, किती दिवस खोट्याने जगता येईल? हे मान्य केले पाहिजे की आज परीक्षा चांगली गेली नाही, प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. हे घरच्यांना अगोदर सांगून टाकावे. निकाल लागल्यानंतर 5 गुण जास्त मिळाले तर घरचेच म्हणतील की तू तर म्हणला होतास की पेपर निट गेले नव्हते पण तुला तर चांगले गुण मिळाले.

स्पर्धा करू नका

रात्रंदिवस स्पर्धेच्या भावनेत जगणे. हुशार मुलांशी तुलना करणे हे चूकीचे आहे. प्रत्येकाने आपल्या आंतरिक शक्तीवर भर दिला पाहिजे. असे केल्यास तणावातून मुक्ती मिळण्यास मदत होते.

परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही…

ज्या दिवशी आपण मानतो की ही परीक्षा गेली तर आयुष्य संपले, तेव्हा टेन्शन येणारच. आयुष्याच्या स्टेशनवर एक ट्रेन चुकली तर दुसरी ट्रेन येऊन तुम्हाला दुसऱ्या मोठ्या स्टेशनवर घेऊन जाईल, काळजी करू नका. परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही.

ताणापासून दुर राहण्याची प्रतीज्ञा घ्या

ताणतणावातून मुक्त होण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. निकालाचा ताण मनावर घेण्याची गरज नाही. या तणावातून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या मनात संकल्प केला पाहिजे, जे काही निकाल येतील त्यात मला जीवन कसे जगायचे ते माहित आहे, मी परिस्थीतीला सामोरे जाईन, आणि आपण हे केले तर ते सोपे होते. म्हणूनच मला वाटतं की हा प्रकार मनावर घेण्याची गरज नाही. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.