Video : उभ्या कारमध्ये झाला स्फोट? कारमध्येच युवकाचा होरपळून मृत्यू

| Updated on: May 17, 2023 | 4:15 PM

Delhi Fire Video : एखाद्या ठिकाणी गाडी उभी करुन गाडीत चालक बसला आहे. त्यावेळी गाडी बंद आहे. परंतु अचानक स्फोट झाला तर? अशीच एक घटना दिल्लीत घडली आहे. या घटनेमुळे पोलिसांसमोरही प्रश्न निर्माण झाला आहे.

Video : उभ्या कारमध्ये झाला स्फोट? कारमध्येच युवकाचा होरपळून मृत्यू
car fire
Follow us on

नवी दिल्ली : एखादे वाहन गेल्या 15 मिनिटांपासून किंवा अर्ध्या तासापासून पार्क केलेले आहे. गाडीत बसूनच तो व्यक्ती त्यात गप्पा मारत आहे किंवा गाणी ऐकत आहे. परंतु अचानक गाडीचा स्फोट होऊन आग लागली. आग इतकी मोठी होती की ती विझवायलाही वेळ मिळाला नाही. सोबत दिलेल्या फोटोमधील ही घटना आहे. या घटनेत गाडीत बसलेला युवकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. आता बंद असलेल्या गाडीचा स्फोट कसा झाला? हाच प्रश्न पोलिसांपुढे आहे.

कारमध्ये स्फोट

हे सुद्धा वाचा

कारमधील स्फोट झाल्याचा हा प्रकार उत्तर दिल्लीच्या नरेला भागातील आहे. या ठिकाणी कारला आग लागली. त्यात एका ३० वर्षीय युवकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना भोरगड औद्योगिक क्षेत्र सेक्टर 5 अंतर्गत घडली आहे. कारला अचानक लागलेल्या आगीत कारस्वाराला बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि आतमध्ये जळून मृत्यू झाला.

मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न

नरेला औद्योगिक क्षेत्र पोलीस स्टेशन मृताची ओळख पटवण्यात गुंतले आहे. मृत झालेला व्यक्ती ३० वर्षीय युवक असल्याचे म्हटले जात आहे. नरेला औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला एक स्विफ्ट कार उभी होती आणि त्यात एक व्यक्ती होता. मिळालेल्या माहितीनुसार, ती कार तेथे 15 मिनिटे उभी होती. अचानक स्फोट होऊन कारने पेट घेतला. आजूबाजूच्या लोकांनी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीला वाचवता आले नाही.

काच फोडण्याचा प्रयत्न

कारचा स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. त्यांनी कारची काच फोडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर खिडकी उघडली, तोपर्यंत ड्रायव्हिंग सीटलाही आग लागली होती. ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या व्यक्ती बेल्ट लावल्यामुळे आजूबाजूचे लोक त्याला खेचू शकले नाहीत. लोकांनी अग्निशमन विभागालाही याबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती.