
Patna Encounter: बिहाराची राजधानी पटणात आरोपी आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. त्यानंतर आरोपी एका घरात घुसले. दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराबंदी केली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून स्पेशल टास्क फोर्सचे कमांडो बोलवले. एके 47 असलेल्या कमांडोंनी बिल्डिंगचा प्रत्येक भाग तपासला. अखेर दोन तासानंतर एका घरात लपलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. परंतु दोन तास रहिवाशी भागात हा थरार सुरु होता. या भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन बसले होते. एका जमीन प्रकरणातून आरोपींनी हा गोळीबार केल्याचे पटणाचे पोलीस अधीक्षक अवकाश कुमार यांनी सांगितले.
कंकरबाग गोळीबार प्रकरणात एसएससी आकाश कुमार यांनी सांगितले की, आरोपींकडून पाच राउंड फायर करण्यात आले आहे. चार गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण जमिनीच्या वादाचे असून यावरून गोळीबार झाला आहे.
पटणा पोलिसांना कंकरबाग गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गोळीबार करणारे गुन्हेगार घरात घुसले. घटनेचे गांभीर्य ओळखून पटणा पोलिसांच्या चार पोलिस ठाण्याचे मोठे पथक घटनास्थळी पोहोचले. पटणाचे एसएसपी आकाश कुमार, एएसपी अभिनव यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. अनेक डीएसपी आणि अनेक इन्स्पेक्टर दर्जाचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसएसपी आकाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. चार आरोपींना पकडण्यात आले असून काही हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
कंकरबाग गोळीबारचा घटनाक्रम दुपारी 2.16 मिनिटांनी घडला. त्याची माहिती पोलिसांना मिळताच दुपारी 2.39 मिनिटांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आरोपी 2.51 मिनिटांनी पसार झाले. ते एका घरात घुसले. दुपारी 3.35 मिनिटांनी एसटीएफ आणि पोलिसांच्या टीमने त्या घराचा ताबा घेतला. अखेर दुपारी 4.15 वाजता चार आरोपींना पकडण्यात आले, असे एसएसपी अवकाश कुमार यांनी सांगितले.