AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदी महान आहेत’! डोनाल्ड ट्रम्प यांना आली मित्राची आठवण, PM मोदींना पाठवले स्पेशल गिफ्ट

Donald Trump and PM Modi: भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी आज (शनिवार) पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना एक खास भेट (मोदी आणि ट्रम्प यांचा फोटो) आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेला एक खास मेसेज दिला. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

'मोदी महान आहेत'! डोनाल्ड ट्रम्प यांना आली मित्राची आठवण, PM मोदींना पाठवले स्पेशल गिफ्ट
Modi trump dosti
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Oct 11, 2025 | 10:35 PM
Share

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी आज (शनिवार) पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना एक खास भेट (मोदी आणि ट्रम्प यांचा फोटो) आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेला एक खास मेसेज दिला. गोर यांनी दिलेल्या या फोटोवर ट्रम्प यांनी मोदींचा उल्लेख ‘मित्र’ असा केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांना उद्देशून लिहिले, “पंतप्रधान, तुम्ही महान आहात.” याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सर्जियो गोर यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे सर्जियो गोर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत दोघांनी संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञानासह अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी सर्जियो गोर यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील अशी आशा व्यक्त केली. गोर सध्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात ते अनेक भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत.

या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर गोर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. यात पंतप्रधान मोदींनी लिहिले की, मला विश्वास आहे की नवीन अमेरिकन राजदूताच्या काळात दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होईल. राजदूत सर्जियो गोर यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे.’

मोदी आणि ट्रम्प मित्र

या भेटीनंतर गोर यांनी पंतप्रधान मोदींसोबतची त्यांची भेट खास असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींना वैयक्तिक मित्र मानतात. अमेरिकेने नेहमीच भारतासोबतच्या संबंधांना विशेष महत्त्व दिले आहे. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीपूर्वी, गोर यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचीही भेट घेतली होती.

दोन्ही देशांचे भविष्य उज्ज्वल असेल

भारतातील प्रमुख नेत्यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना गोर म्हणाले की, “मी भारतात येणे हा सन्मान आणि सौभाग्य आहे. पंतप्रधान मोदींसोबत नुकतीच एक अद्भुत बैठक झाली. यात आम्ही संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञानासह द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. आम्ही महत्त्वाची खनिजे किती महत्त्वाची आहेत आणि दोन्ही देशांसाठी त्यांचे महत्त्व काय आहे. अमेरिका भारतासोबतच्या संबंधांना महत्त्व देत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या मजबूत नेतृत्वाखाली मी दोन्ही देशांचे भविष्य उज्ज्वल असेल अशी मला आशा आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...