AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त कलाकारांकडून खास भेट; तुम्ही ऐकलं का हे गाणं?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या 25 वर्षांत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून आपल्या कार्यकाळात सुशासनाचे अनेक नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

PM Modi: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त कलाकारांकडून खास भेट; तुम्ही ऐकलं का हे गाणं?
नरेंद्र मोदीImage Credit source: ANI
| Updated on: Sep 17, 2026 | 11:06 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर) रोजी 76 वा वाढदिवस आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदींच्या कारकिर्दीचा 25 वर्षांचा टप्पा लक्षात घेऊन महिनाभर चालणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ची सुरुवातही आजपासून करण्यात येत आहे. या अभियानातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘आशीर्वाद का दिया’. या माध्यमातून सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरांमध्ये दिवे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय संगीतकार अमन पंत आणि स्नेहा शंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ‘आशीर्वाद का दिया’ हे गीत प्रदर्शित करण्यात आलं आहे. पंत यांनी संगीतबद्ध केलेले आणि शंकर यांनी गायलेलं हे गाणं मोदींना एक संगीतमय समर्पण म्हणून सादर करण्यात आलं आहे.

याविषयी पंत आणि शंकर यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं, ‘आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सार्वजनिक जीवन पाहत मोठे झालो आहोत. याच प्रवासातून प्रेरित होऊन आम्ही हे गाणं त्यांना समर्पित करत आहोत.’ भारतीय जनता पक्षाने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत महिनाभर चालणारं ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू केलं असून त्यात विविध सेवा आणि जनजागृती कार्यक्रमांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Aman Pant (@amanpant02)

काय आहे ‘आशीर्वाद का दिया’?

‘आशीर्वाद का दिया’ या उपक्रमांतर्गत 17 सप्टेंबरच्या संध्याकाळी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दिवा लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः केंद्र किंवा राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेतलेल्या कुटुंबांचा या उपक्रमात सहभाग अपेक्षित आहे. दिवा लावल्यानंतर त्याचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी #AshirwadKaDiya हा हॅशटॅग वापरण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या कालखंडाची नोंद घेण्यासाठी भाजपकडून विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. या अभियानात मोदींच्या राजकीय आणि सार्वजनिक प्रवासाशी संबंधित फोटो आणि डिजिटल प्रदर्शनं, विकासकामं आणि सरकारी योजनांवर आधारित कार्यक्रम, चर्चासत्रे तसंच युवकांशी संवाद अशा उपक्रमांचा समावेश आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...