पंतप्रधान मोदींचे बालपण, हिमालयात घालवलेले वर्ष… लेक्स फ्रीडमनच्या ‘एपिक पॉडकास्ट’मध्ये काय?

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तीन तासांचे संभाषण आहे. ते 16 मार्च रोजी प्रसारित होणार आहे. यामध्ये मोदी यांच्या जीवनातील प्रवास यावर चर्चा करण्यात आली. फ्रीडमन यांनी हा पॉडकास्ट आयुष्यातील सर्वात प्रभावशाली संभाषण असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींचे बालपण, हिमालयात घालवलेले वर्ष... लेक्स फ्रीडमनच्या एपिक पॉडकास्टमध्ये काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन.
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 16, 2025 | 6:06 PM

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा पॉडकास्ट येत्या 16 मार्च रोजी प्रसारित होणार आहे. संध्याकाळी 5:30 वाजता ही मुलाखत प्रसारीत होणार आहे.  या पॉडकास्टसंदर्भात सर्वत्र उत्सुक्ता आहे. त्यासंदर्भात लेक्स फ्रीडमन यांनी X वर माहिती शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी माझे तीन तासांचे संभाषण झाले. ही मुलाखत माझ्या जीवनातील हे सर्वात लक्षणीय असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही X वरील फ्रीडमनच्या पोस्टला उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, बालपण आणि सार्वजनिक जीवनातील प्रवास यासह विविध विषयांचा समावेश असलेले हे आकर्षक संभाषण आहे. माझी हिमालयातील वर्षे आणि सार्वजनिक जीवनातील माझा प्रवास यासह विविध विषयांचा समावेश असलेले हे संभाषण आहे. लेक्स फ्रीडमन यांच्यासोबत झाले. ही मुलाखत रंगतदार असणार आहे.

पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेण्यासाठी भारतात आले होते. मोदी यांच्या भेटीपूर्वी फ्रिडमन यांनी भारताच्या इतिहासासह अनेक विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत तासनतास बोलण्याचा मिळालेल्या आनंदाबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यावेळी फ्रीडमन यांनी मोदी यांना सर्वात आकर्षक व्यक्तीमत्व असल्याचे म्हटले होते.

19 जानेवारी रोजी X वर एका पोस्टद्वारे फ्रीडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेण्याचा त्यांचा निर्णय जाहीर केला होता. ते म्हणाले होते की, मी फेब्रुवारीच्या अखेरीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पॉडकास्ट करणार आहे. मी भारतात कधीच गेलो नाही. त्यामुळे भारतीय संस्कृती, इतिहास, लोक यांच्या अनेक पैलूंचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे.

कोण आहे लेक्स फ्रीडमन

लेक्स फ्रीडमन हे अमेरिकन आहेत. ते व्यवसायाने संगणक शास्त्रज्ञ आणि पॉडकास्टर आहेत. ‘लेक्स फ्रीडमन पॉडकास्ट’मध्ये त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या आहेत.