विकसित भारत, आत्मनिर्भर भारत हेच लक्ष्य’; विजयादशमीच्या सोहळ्यात मोदींनी सांगितली श्रीरामांकडून मिळणारी प्रेरणा
PM Narendra Modi Speech News: विजयादशमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आयपी एक्सटेंशन येथे दसरा उत्सवात सहभाग घेतला. त्यांनी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले आहे. यानंतर त्यांनी भाषण केले आहे.

इंद्रप्रस्थ रामलीला समितीने आयोजित केलेल्या विजयादशमी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. हा कार्यक्रम पूर्व दिल्लीतील आयपी एक्सटेंशन येथील DDA मैदानावर पार पडत आहे. या सोहळ्यात बनावट औषध आणि MRP द्वारे होणाऱ्या ग्राहकांच्या कथित शोषणावर प्रकाश टाकत रावणाचा पुतळा प्रतीक असणार आहे. ही समिती गेल्या २५ वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला आहे. त्यांनी त्यांच्या भाषणातून देशातील नागरिकांना एक आवाहन केले आहे.
विजयादशमी सोहळ्याच्या या कार्यक्रमाला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय राज्यमंत्री आणि दिल्ली भाजप अध्यक्ष हर्ष मल्होत्रा कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान कार्यक्रमाला उपस्थित असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला आहे. यात त्यांनी देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नंतर रामराज्यचा खरा अर्थ मोदींनी समजवून सांगितला आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,आज भारताचा कानाकोपरा रामाने भरला आहे. हा असत्यावर सत्याच्या विजयाचा उत्सव आहे. रामराज्य म्हणजे सर्वांना न्याय मिळणार आहे.रामराज्य म्हणजे कुणासोबत भेदभाव होणार नाही. श्रीरामाच्या जीवनातून आपल्याला खूप शिकायला मिळालं. मार्गात येणाऱ्या अडचणी आपल्याला थांबवू शकत नाहीत. कितीही कठीण परिस्थिती असली तरी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. स्वत:च्या शक्तींवर विश्वास ठेवणं श्रीरामांनी शिकवलं आहे. आपल्यासमोर विकसित भारताचं लक्ष्य आहे, असं ते म्हणाले आहे.
ते म्हणाले की, प्रत्येक गाव आणि शहरात रामलीलेच्या उत्सवात देश मग्न आहे. देशभरात रामलीलांचे आयोजन ही भगवान श्रीरामांचे आदर्श जिवंत ठेवण्याची एक परंपरा आहे. आपण गरीब आणि वंचितांच्या सेवेला प्राधान्य दिले पाहिजे. आपण श्रीरामांच्या जीवनातून अनेक धडे शिकतो. समस्या किंवा आव्हान कितीही मोठे असले तरी, आपण इतरांवर अवलंबून राहता कामा नये. आपण आपल्या दृढनिश्चयाचे शक्तीत रूपांतर केले पाहिजे. आपण आपल्या कठोर परिश्रमातून मार्ग शोधला पाहिजे. मार्गातील अडचणी आपले शौर्य थांबवू शकत नाहीत.
पंतप्रधान म्हणाले की, विकसित भारत, आत्मनिर्भर भारत हे आपले ध्येय आहे. यासाठी आपण प्रभू रामाकडूनही प्रेरणा घेतली पाहिजे. जेव्हा राष्ट्रात आत्मसन्मानाची भावना असते, तेव्हाच ते सर्व प्रकारची प्रगती साधू शकते. शतकानुशतके आपला वारसा लुटला गेला आणि परदेशात नेला गेला. पण आज आपण आपला वारसा परत आणत आहोत. गेल्या १२ वर्षांत १०० हून अधिक मूर्ती भारतात परत आणण्यात आल्या आहेत.
