AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी, आताच कामं उरकून घ्या अन्यथा अडथळा येईल

पंजाब नॅशनल बँके जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अतशिय महत्त्वाची आहे. जर लक्ष दिले नाही तर तुम्हाला मोठा अडथळ्याला सामोरे जावे लागेल.

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी, आताच कामं उरकून घ्या अन्यथा अडथळा येईल
pnb mobile bank app
| Updated on: Jul 16, 2026 | 9:45 AM
Share

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्ही PNB चे लोकप्रिय मोबाईल बँकिंग ॲप, ‘PNB ONE,’ किंवा इतर ऑनलाइन बँकिंग सेवा वापरत असाल, तर तुम्ही तुमच्या डिजिटल व्यवहारांचे नियोजन आगाऊ करावे. सिस्टीम अपग्रेड आणि नियोजित देखभालीमुळे पुढील दोन दिवसांत ऑनलाइन सेवांमध्ये काही तासांसाठी व्यत्यय येणार असल्याची सूचना बँकेने दिली आहे. बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या अधिकृत सूचनेनुसार, ही देखभालीची प्रक्रिया दोन वेगवेगळ्या दिवशी, रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी पार पाडली जाईल. बँकेने वेळाही जाहीर केल्या आहेत. आता या वेळा कोणत्या आहे ते जाणून घ्या…

16 जुलै, 2026: रात्री 12:00 ते पहाटे 2:00 (2 तास)

17 जुलै, 2026: पहाटे 2:00 ते पहाटे 4:00 (2 तास)

या नियोजित देखभालीच्या कालावधीत, PNB ONE ॲप, इंटरनेट बँकिंग, UPI ट्रान्सफर आणि इमिजिएट पेमेंट सर्व्हिस यांसारख्या डिजिटल सेवा अंशतः किंवा पूर्णपणे अनुपलब्ध असू शकतात. बँक ग्राहकांना सल्ला देते की, कोणताही त्रास टाळण्यासाठी त्यांनी आपली अत्यावश्यक देयके, आपत्कालीन निधी हस्तांतरण किंवा इतर ऑनलाइन बँकिंग व्यवहार या अंतिम मुदतीपूर्वी किंवा नंतर पूर्ण करावेत. डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित, वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत करण्यासाठी बँका वेळोवेळी त्यांचे सर्व्हर अद्ययावत करतात. ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी, अशी तांत्रिक देखभाल नेहमी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या शांत वेळेत नियोजित केली जाते. जर तुमचे पीएनबीमध्ये खाते असेल, तर तुमच्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन या वेळापत्रकानुसार करा.

तुम्ही पीएनबी वन ॲपद्वारे ही महत्त्वाची अनेक कामे करू शकता. पंजाब नॅशनल बँक वन ॲप ग्राहकांना व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळवण्याची सुविधा देखील देते. तुम्ही डेबिट कार्ड पर्यायावर जाऊन व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळवू शकता. या ॲपद्वारे, ग्राहक मोबाईल बिल, लँडलाईन बिल, डीटीएच बिल, वीज बिल आणि इतर अनेक बिले भरू शकतात. पीएनबी वन ॲपद्वारे ग्राहक पॉझिटिव्ह पे प्रणाली वापरून चेकची पडताळणी करू शकतात. तुम्ही ऑनलाइन डिमॅट खाते उघडू शकता. तुम्ही कोणत्याही खात्यात ऑनलाइन पैसे हस्तांतरित करू शकता. तुम्ही सुकन्या समृद्धी योजना, एनपीएस आणि इतर खात्यांमध्ये निधी हस्तांतरित करू शकता. तुम्ही आयकर विवरणपत्र भरण्यासाठी टीडीएस/फॉर्म 16 देखील तयार करू शकता. या ॲपद्वारे तुम्हाला व्हॉइस असिस्टन्सचाही लाभ मिळेल.

Follow Us
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित