प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री

पणजी : गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोमवारी रात्री 1 वाजून 46 मिनिटांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनितेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर मनोहर आजगावकर, विनोद पालयेकर, जयेश …

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री

पणजी : गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोमवारी रात्री 1 वाजून 46 मिनिटांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनितेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर मनोहर आजगावकर, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक यांनाही मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. 


गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं 17 मार्च रोजी निधन झालं. त्यानंतर गोव्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. सोमवारी पर्रिकरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वीच गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचं नाव भाजपकडून निश्चित झालं होतं. कारण गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या होत्या.

पर्रिकरांवर अंत्यसंस्कार होण्याचीही वाट न पाहता, राजकीय गणित जुळवण्यास काँग्रेस आणि भाजपने सुरुवात केली होती. अखेर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निकटवर्तीय असलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

कोण आहेत डॉ. प्रमोद सावंत?

  • डॉ. प्रमोद सावंत हे गोव्यातील सांखळी मतदार संघाचे भाजपचे आमदार आहेत. सध्या ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष  आहेत.
  • डॉ. प्रमोद सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला.
  • पांडुरंग सावंत आणि पद्मिनी सावंत अशी त्यांच्या आई-वडिलांची नावे आहेत.
  • डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
  • त्यांनी गंगा शिक्षण संस्था कोल्हापूर येथून आयुर्वेदाची पदवी घेतली.
  • त्यानंतर त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापिठातून त्यांनी समाजसेवेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
  • त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या रसायनशास्त्राच्या शिक्षिका आहेत. सध्या त्या गोव्याच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *