राष्ट्रपतींच्या अंगरक्षकावर गोळीबार, फटाके फोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून घडली घटना

राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका सैनिकाच्या डोक्यात गोळी लागल्याची घटना घडली आहे. फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकावर गोळीबार, फटाके फोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून घडली घटना
president bodyguard saurabh tomar
| Updated on: Nov 11, 2026 | 11:11 AM

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात, दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्यावरून झालेला वाद गोळीबारापर्यंत पोहोचला. या गोळीबारात राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका सैनिकाच्या डोक्यात गोळी लागली. या जखमी सैनिकाची ओळख सौरभ तोमर अशी पटली आहे. तो मेरठमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सुट्टीसाठी आपल्या घरी आल्यानंतर ही घटना घडली असून याची सगळीकडेच चर्चा सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिस आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ तोमर आपल्या घराबाहेर भाऊ विनीत आणि मिंटू यांच्यासोबत फटाके फोडत होता. त्याच वेळी, गावातील धीरज आणि त्याचा भाऊ मोनू यांच्यासोबत त्यांचे भांडण झाले. काही वेळातच हे भांडण शाब्दिक बाचाबाचीवरून हिंसक वळणावर पोहोचले. काही वेळातच दोन्ही बाजूंमधील तणाव वाढला. काही क्षणातच धीरजने कथितरीत्या गावठी पिस्तूल काढून गोळीबार केला. एक गोळी भिंतीवर आदळल्यानंतर सौरभच्या डोक्यात, कानाच्या अगदी मागे लागली.

Loading...

डोक्यावर लागला मार

गोळी लागल्यानंतर सौरभ खाली पडला. त्याच वेळी, धीरजचा भाऊ तिथे काठी घेऊन आला आणि त्याने विनीतवर हल्ला केला. त्यानंतर झालेल्या झटापटीत, मिंटूने काठीने मोनूवर वार केला. घटनास्थळी जमलेली गर्दी घाबरून इकडे तिकडे गेली आणि याचाच फायदा घेऊन आरोपी तिथून पळून गेले.

दिवाळीसाठी आलेला गावी

स्थानिक वृत्तांनुसार, हे सगळे एकमेकांना ओळखत होते एवढंच नाही तर त्यांचे पूर्वी चांगले संबंध होते. अनेकदा एकत्र वेळ घालवत असत, मात्र सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद सुरु असल्याचेही वृत्त आहे. २६ वर्षीय सौरभ २०२१ मध्ये सैन्यात भरती झाला होता आणि सध्या तो राष्ट्रपती भवनात ‘प्रेसिडंट्स बॉडीगार्ड’ या तुकडीत तैनात आहे. तो दिवाळी साजरी करण्यासाठी रजेवर आपल्या गावी आलेला होता.

सध्या रुग्णालयात घेत आहे उपचार

गोळीबारानंतर, त्याचे कुटुंबीय त्याला बडौत येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्याला मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले, परंतु कुटुंबीयांनी त्याला मेरठमधील एका खाजगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या डोक्यातून गोळी बाहेर काढली. तो अजूनही अतिदक्षता विभागात (ICU) दाखल असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

या घटनेनंतर, सौरभचे वडील जनक राज यांनी आपत्कालीन हेल्पलाइनवर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांची पथके गावात पोहोचली आणि त्यांनी तपास सुरू केला. जनक राज यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे धीरज आणि मोनू (उर्फ प्रवीण) यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. फरार असलेल्या आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us