अरविंद केजरीवाल यांना मोठा हादरा, पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

अरविंद केजरीवाल यांना मोठा हादरा बसला आहे. आम आदमी पक्षातील बड्या नेत्याने केजरीवाल यांची साथ सोडली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

अरविंद केजरीवाल यांना मोठा हादरा, पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली
arvind kejriwal
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 2:39 PM

आम आदमी पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वी राघव चढ्ढा यांच्यासहित काही नेत्यांनी आपची साथ सोडली होती. त्यानंतर आता आणखी एका बड्याने पक्षाची साथ सोडली आहे. आपच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कक्कड यांच्यासहित रजत राकेश टंडन आणि माजी आमदार श्याम सुंदर शर्मा यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पेशाने वकील असलेल्या प्रियंका कक्कड या ‘आप’च्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. प्रियंका या वृत्त वाहिनीवर आक्रमकरित्या आपची बाजू मांडायच्या. त्यांचे भाजप प्रवक्त्यांना धारेवर धरतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांनी अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, वरिष्ठ नेते राजीव शुक्ला, पवन खेरा यांच्या उपस्थितीत प्रियंका कक्कड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रियंका कक्कड म्हणाल्या, ‘मी आज अभिमानाने काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. कारण मला आधीसारखी दिल्ली हवी आहे. मला स्वच्छ, आधुनिक आणि सुरक्षित दिल्ली हवी आहे, अशा दिल्लीत मी लहानाची मोठी झाली. मागील एका दशकाच्या अनुभवावरून दिसून येते की, ही बाब राहुल गांधी हेच करू शकतात. देशात आताच्या घडीला राहुल गांधी हेच विश्वासार्ह नेते आहेत. ते एकमेव नेते आहेत,त्यांनी कॅमेऱ्यासमोर अश्रू ढाळले नाहीत. राहुल गांधींना लक्ष करण्यासाठी अनेक यंत्रणा काम करत आहेत. त्यानंतरही राहुल गांधी भूमिकेवर ठाम आहेत’.

Loading...

प्रियंका कक्कड यांनी आम आदमी पक्ष सोडल्यानंतर थेट पक्षातील प्रमुख नेत्यावर टीका केली. ‘पक्षाचे प्रमुख नेते सुरुवातीला  बंगला गाडी घेणार नाही, असे बोलत होते. पण काही दिवसांनी खासगी यात्रेसाठी हॅलिकॉप्टरचा वापर होऊ लागला. यावरून होणाऱ्या टीकेचा बचाव करता येत नव्हता. आम आदमी पक्षाशी अनेक विचारवंत जोडले गेले. परंतु ते जास्त वेळ टिकले नाहीत. ज्या नेत्यांनी कधी बुथ पातळीवर काम केलं नाही. त्यांना राजस्थानमधून थेट पंजाबमध्ये मोठे पद दिले जात आहेत. तसेच बंगला, गाडी दिली जात आहे, त्या टीकेचाही बचाव करता येत नव्हता’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us