काँग्रेस पक्षात मोठा फेरबदल! नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती; पडद्यामागं नेमकं काय घडलं?
Congress Reshuffle: निवडणुकांआधी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाल्याचे दिसून आले आहे. पंजाब-यूपीला नवे प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी शुक्रवारी सकाळी अध्यक्षपदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सादर केला होता. यानंतर आता सायंकाळपर्यंत काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. परगत सिंग यांची प्रदेश काँग्रेस समिती प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी परगत सिंग यांची पंजाब प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे.’ आपल्या निवेदनात काँग्रेसने अमरिंदर सिंग राजा वडिंग यांच्या योगदानाची प्रशंसाही केली आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
काँग्रेस पक्षाने पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पंजाबमध्ये परगत सिंग यांची तर उत्तर प्रदेशमध्ये आराधना मिश्रा यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाब काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळाले आहेत. अमरिंदर सिंग राजा वॉरिंग यांच्या राजीनाम्यानंतर माजी हॉकी कर्णधार आणि ऑलिम्पियन परगत सिंग यांची पंजाब काँग्रेस समितीच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वातील हा बदल महत्त्वपूर्ण आहे. कारण पंजाब काँग्रेस गेल्या काही काळापासून अंतर्गत अशांततेचा सामना करत आहे. काँग्रेस पक्षाने जारी केलेल्या निवेदनानुसार, परगत सिंग यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी तात्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली आहे. २ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिलेल्या अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्या कार्यकाळाबद्दल त्यांचे आभारही मानण्यात आले.
परगत सिंग यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे, जेव्हा पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षांच्या बदलीवर सातत्याने चर्चा सुरू आहे. या पदासाठी पूर्वी विजय इंदर सिंगला यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. काही काळापासून पक्षात सिंगला यांच्या नावावर बरीच चर्चा सुरू होती. सुखजिंदर सिंग रंधावा, गुरजीत सिंग औजला, सुखबिंदर सिंग सरकारिया आणि परगत सिंग यांच्या नावांवरही चर्चा झाली होती.
