AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खामेनी ठार होताच भारतात संताप, उत्तर प्रदेशात लोक थेट…नेमकं काय घडतंय?

Protest in India Over Khamenei Death : अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता भारतातही लोक रस्त्यावर उतरले आहेत.

खामेनी ठार होताच भारतात संताप, उत्तर प्रदेशात लोक थेट...नेमकं काय घडतंय?
Protest in indiaImage Credit source: Google
| Updated on: Mar 01, 2026 | 6:05 PM
Share

इस्रायल आणि इराण यांच्यात भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे इराणसह जगातील अनेक भागातील शिया मुस्लिमांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आता भारतातही खामेनी यांच्या मृत्यूमुळे संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रविवारी जिल्ह्यातील हजारो शिया पुरुष, महिला आणि मुले रस्त्यावर उतरले. यावेळी या लोकांनी खामेनींचे पोस्टर आणि काळे झेंडे घेऊन अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जौनपूरमध्ये निदर्शकांची घोषणाबाजी

अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील कल्लू इमामबाडा येथे हजारो लोक जमले आहेत. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. यावेळी गर्दीतून एकच आवाज घुमला, “तुम्ही एका हुसेनीला माराल, तर प्रत्येक घरातून दुसरा बाहेर येईल.” यावेळी या निदर्शकांनी म्हटले की, ही चळवळ एक व्यक्ती शहीद झाल्याने संपणार नाही तर ती आणखी मजबूत होईल.”

मौलवी नेते कल्बे जवाद आक्रमक

प्रसिद्ध शिया धर्मगुरू मौलाना सय्यद कल्बे जवाद यांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या या हल्ल्याला “कायर दहशतवादी हल्ला” म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, “अयातुल्ला अली खामेनी नेहमीच हौतात्म्यासाठी प्रार्थना करत असत आणि लढताना ते शहीद झाले. आपल्या धर्मात शहीद होणे हे सर्वोच्च स्थान आहे. खामेनींचे रक्त व्यर्थ जाणार नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी खमेनींना शहीद केलेले नाही, तर त्यांनी स्वतःच्या मृत्युदंडाच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली आहे. त्यांचे मृत्यू अत्यंत दुःखद असतील.”

3 दिवसांचा शोक जाहीर

मौलाना कल्बे जवाद यांनी देशभरातील शिया मुस्लिम समुदायाला तीन दिवसांचा शोक पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांना लोकांना आपली दुकाने आणि व्यवसाय स्वेच्छेने बंद ठेवण्यासही सांगितले आहे. त्याचबरोबर देशभरात एकाच वेळी शोक सभा आणि कँन्डल मार्च आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर घरांवर काळे झेंडे फडकावून निषेध नोंदवण्यात यावा असंही त्यांनी म्हटले आहे.

प्रशासन सतर्क

जौनपूरमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे पोलिस आणि प्रशासन पूर्ण सतर्क आहे. कल्लू इमामबाडा आणि संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...