AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन युद्धात इराणची सर्वात मोठी घोषणा! या नेत्यावर मोठी जबाबदारी, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत

Iran New Supreme Leader : इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर एका वरिष्ठ धर्मगुरूची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ऐन युद्धात इराणची सर्वात मोठी घोषणा! या नेत्यावर मोठी जबाबदारी, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत
Iran New Supreme LeaderImage Credit source: Google
| Updated on: Mar 01, 2026 | 5:21 PM
Share

मद्ध पूर्वेत युद्धाचा भडका उडालेला आहे. इस्रायल आणि अमेरिका सातत्याने इराणवर हल्ले करत आहे. इराणकडूनही या हल्ल्याना प्रत्युत्तर दिले जात आहे. अशाच एका हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. अशातच आता खामेनी यांच्या मृत्यूनंतर वरिष्ठ धर्मगुरू अयातुल्लाह अलिरेझा अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. आता युद्धाच्या काळात देशाला सावरण्याची आणि शत्रूशी लढण्याची जबाबदारी अराफी यांच्यावर असणार आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

अराफी घेणार खामेनी यांची जागा

अयातुल्लाह अलिरेझा अराफी यांची अंतरिम नेतृत्व परिषदेचे कायदेतज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इराणच्या संविधानानुसार नवीन नेता निवडला जाईपर्यंत संक्रमण परिषद सर्वोच्च नेत्याची जबाबदारी स्वीकारेल. अंतरिम परिषदमध्ये अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, मुख्य न्यायाधीश गुलाम-होसेन मोहसेनी-एजेई आणि पालक परिषदेतील एक धर्मगुरू यांचा समावेश आहे. अयातुल्लाह अलिरेझा अराफी हे पालक परिषदेतील धर्मगुरू असणार आहेत. त्यामुळे अराफी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

अराफी यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी

अयातुल्लाह अली खामेनी यांच्या निधनानंतर अयातुल्ला अराफी हे सर्वोच्च नेता म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. अमेरिका अयातुल्ला अली खमेनी यांना कट्टर शत्रू मानत होती. इराणमधील संवैधानिक प्रक्रियेनुसार, खमेनींच्या परवानगीशिवाय एक पानही हलत नव्हते. आता अराफी तात्पुरते त्यांचे पद स्वीकारणार आहेत. त्यांना अध्यक्ष मसूद पजेश्कियान, मुख्य न्यायाधीश गुलाम होसेनी मोहसेनी एजेई यांची साथ मिळणार आहे.

1989 पासून खामेनींच्या हातात होती इराणची सत्ता

अयातुल्ला अली खामेनी हे 1989 पासून इराण राज्य करत होते. शनिवारी 86 वर्षीय खामेनी अमेरिका-इस्रायली लष्करी हल्ल्यात मारले गेले. या कारवाईत इराणमधील लष्करी तळ, सरकारी ठिकाणे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्या या हल्ल्यात इराणचे इतरही काही महत्त्वाचे अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...