“साक्षीचे दावे सगळे खोटे”; कुस्तीपटूंच्या वादाला नवीन तोंड…

| Updated on: Jun 18, 2023 | 11:53 PM

साक्षीने मात्र दावा केला आहे की, याआधी अल्पवयीन खेळाडूने कलम 161 अन्वये पोलिसांसमोर आणि नंतर कलम 164 अन्वये दंडाधिकार्‍यांसमोर आपला जबाब नोंदवला होता.

साक्षीचे दावे सगळे खोटे; कुस्तीपटूंच्या वादाला नवीन तोंड...
Follow us on

नवी दिल्ली : कुस्तीपटू साक्षी मलिकने शनिवारी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिने आरोप केला आहे की ब्रिजभूषण शरण सिंह यानी एका एका अल्पवयीन खेळाडूच्या कुटुंबाला धमकावले होते. त्यांच्या त्या धमकीमुळे अल्पवयीन खेळाडूने आपले मत बदलले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर अल्पवयीन महिला खेळाडूच्या वडिलांनी रविवारी स्पष्ट केले की, आमच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची धमकी वगैरे काही मिळाले नाही.

या आंदोलनाला आता वेगळी दिशा मिळू लागल्याचे बोलले जात आहे. अल्पवयीन खेळाडूने यापूर्वी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

मात्र, त्यानंतर त्यांनी आपले मत बदलले आहे. साक्षी आणि तिचा पती सत्यव्रत कादियान यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर त्या अल्पवयीन खेळाडूच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खरं तर, व्हिडिओमध्ये, साक्षी आणि तिच्या पतीने ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि दावा केला आहे की त्यांनी अल्पवयीन खेळाडूच्या कुटुंबाला धमकी देऊन विधान बदलण्यासाठी दबाव आणला होता.

तर या प्रकरणावरून एका वृत्तवाहिनीशी बोलताना अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आपल्या मुलीचे मत बदलण्यासाठी त्यांच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला होता असं सांगण्यात आले मात्र तसे काह अजिबात झाले नाही. त्यामुळे साक्षी मलिकने केलेल्या दाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही असंही त्यांनी म्हटले आहे.

तर साक्षीने मात्र दावा केला आहे की, याआधी अल्पवयीन खेळाडूने कलम 161 अन्वये पोलिसांसमोर आणि नंतर कलम 164 अन्वये दंडाधिकार्‍यांसमोर आपला जबाब नोंदवला होता.

त्यामुळे अल्पवयीन कुस्तीपटूने आपल्या कुटुंबावर दबाव निर्माण केल्यामुळे हे विधान बदललेले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दिल्ली पोलिसांच्या शिफारशीनंतर साक्षी मलिकने हे विधान केले आहे ज्यात अल्पवयीन कुस्तीपटूने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार पुराव्याअभावी फेटाळण्यास सांगण्यात आली होती.