Video: भाजप नेत्याला पळवू पळवू मारलं, गडबड घोटाळ्याच्या आरोपानं वाद, सहा जणांवर गुन्हा दाखल

| Updated on: Jun 20, 2022 | 4:56 PM

मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला पोलिस स्टेशन हद्दीतील मनोहरपूर रतनपूर कला मार्गावर काही लोकांनी भाजप नेत्याला मारहाण सुरू केल्यावर गोंधळ उडाला. तेथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

Video: भाजप नेत्याला पळवू पळवू मारलं, गडबड घोटाळ्याच्या आरोपानं वाद, सहा जणांवर गुन्हा दाखल
व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: tv9
Follow us on

मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद (Moradabad) जनपदमधील माढोला पोलीस स्टेशन परिसरातील सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Video Viral) होत आहे. तर या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ लोक भाजपच्या एका नेत्याला (BJP leader beaten) पळवून पळवून मारताना दिसत आहेत. दरम्यान व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी भाजप नेत्याच्या तक्रारीवरून कुंडरकी येथील ब्लॉक प्रमुखाच्या पतीसह त्याचा भाऊ आणि साथीदारविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. त्यावर मारहान झालेल्या भाजपच्या नेत्याने सांगितलं आहे की, त्याच्याकडे गडबड घोटाळ्याप्रकरणी एक तक्रार आली होती. त्यावरूनच मला मारहान झाली आहे.

दरम्यान मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला पोलिस स्टेशन हद्दीतील मनोहरपूर रतनपूर कला मार्गावर काही लोकांनी भाजप नेत्याला मारहाण सुरू केल्यावर गोंधळ उडाला. तेथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी पीडित भाजप नेत्याने तिच्या कुंडरकी ब्लॉक प्रमुखाच्या पतीने विकासकामांमध्ये हेराफेरीची तक्रार केल्याचा आरोप केला आहे. मुरादाबादमधील अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तपासामुळे कुंडरकी ब्लॉक प्रमुखाचे पती आणि मेहुणे नाराज आहेत. याच वैमनस्यातून या लोकांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे भाजप नेत्याने सांगितले.

सहा जणांवर गुन्हा दाखल

त्याचवेळी पोलिसांनी भाजप नेते पुष्पेंद्र यांच्या तक्रारीवर माढोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तपासानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, ब्लॉक प्रमुखाच्या पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन पक्षात हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

याचदरम्यान या प्रकरणावरून सिव्हिल लायंस आशुतोष तिवारी यांचे म्हणणे आहे की, दोन पक्षांमधील हाणामारीचा हा व्हिडीओ आहे. यातील एका पक्षाने तक्रार दिली आहे. तर सध्या तपास सुरू असून जे समोर येईल त्यावरून कारवाई ही केली जाईल.