AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pulawama Mastermind Killed : महत्वाची बातमी, भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा

Pulawama Mastermind Killed : भारताच्या एका मोठ्या शत्रुचा पाकव्याप्त काश्मीरमध्ये खात्मा झाला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडला उडवलं आहे. भारताने पुलवामा हल्ल्यात आपले शूर 40 सैनिक गमावले होते.

Pulawama Mastermind Killed : महत्वाची बातमी, भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा
hamja Burhan
| Updated on: May 21, 2026 | 3:28 PM
Share

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा खात्मा झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये हमजा बुरहानची हत्या झाली आहे. एका अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात हमजा बुरहानचा मृत्यू झाला. हमजा बुरहान पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. अल बदरचा तो प्रमुख होता. पाकिस्तानात बसून त्याने भारताविरोधात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले. त्याता पुलवामा एका प्रमुख मोठा हल्ला होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताने आपले CRPF चे 40 जवान गमावले होते. हा हमजा पाकिस्तानात स्वत:ला शिक्षक म्हणून दाखवायचा. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे जवानांच्या बसला स्फोटकांनी भरलेली कार येऊन आदळली होती. त्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते.

एका अज्ञात बंदुकधाऱ्याने हमजा बुरहानवर मुजफ्फराबादमध्ये गोळ्या झाडल्या. हमजा पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपल्या कार्यालयाजवळ असताना हा हल्ला झाला. काही लोक तिथे आले व त्यांनी हमाजच्या शरीराची गोळ्यांनी चाळण केली. 2019 नंतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. पीओकेमध्ये तो दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत होता. दहशतवाद्यांची घुसखोरीसाठी मदत करायचा.

पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने बालाकोटमध्ये ऑपरेशन केलं. भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. इंडियन एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी बालाकोटमध्ये घुसून दहशतवादी तळ उडवून दिले होते.

दुपारी 3.15 च्या सुमारास धडक

14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3.15 च्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवे वर एक भयानक दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी स्थानिक कश्मिरी युवक आदिल अहमद डारने 300-350 किलो IED स्फोटकांनी भरलेलं वाहन CRPF च्या बसलं धडकवलं. यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर 12 दिवसांनी 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला केला. यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले होते.

ही यादी मोठी

मागच्या काही वर्षात पाकिस्तानात राहून भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणारे किंवा आधी ज्यांनी केल्या आहेत, त्यांना एक-एक करुन संपवलं जात आहे. यामागे कोण आहे? माहित नाही. पण अज्ञात बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात हे दहशतवादी मारले जात आहेत. पाकिस्तानात अज्ञात बंदुकधाऱ्याच्या हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांची यादी मोठी आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा