Rahul Gandhi : 3 वर्षे जुन्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा, जाणून घ्या काय होतं प्रकरण?

| Updated on: May 13, 2022 | 6:04 AM

झारखंड हायकोर्टाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान झारखंडमधील चाईबासा येथे राहुल गांधी यांनी तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल ट्रायल कोर्टाने जारी केलेल्या वॉरंटला दिलासा दिला.

Rahul Gandhi : 3 वर्षे जुन्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा, जाणून घ्या काय होतं प्रकरण?
काँग्रेस नेते राहुल गांधी
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. गुरुवारी झारखंड हायकोर्टात यावर सुनावणी झाली. त्यामुळे न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी कथितपणे वादग्रस्त विधान केले होते.

दंडात्मक कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश

झारखंड हायकोर्टाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान झारखंडमधील चाईबासा येथे राहुल गांधी यांनी तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल ट्रायल कोर्टाने जारी केलेल्या वॉरंटला दिलासा दिला. यासोबतच त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय द्विवेदी यांनी राहुल गांधी यांच्यावरील कोणत्याही दंडात्मक कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश दिले.

याचिकाकर्त्याला नोटीस बजावली आहे

या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाच्या कार्यवाहीलाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याचिकाकर्त्याला नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. वरील निर्देशांसह न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 26 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

हे सुद्धा वाचा