AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ, दुहेरी नागरिकत्व प्रकरणात हायकोर्टाने एफआयआर दाखल करण्याचा आदेश

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपाप्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी हा आदेश दिला आहे. कोर्टाने या प्रकरणात तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाईचे देखील निर्देश दिले आहेत.

राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ, दुहेरी नागरिकत्व प्रकरणात हायकोर्टाने एफआयआर दाखल करण्याचा आदेश
RAHUL GANDHI
| Updated on: Apr 17, 2026 | 8:55 PM
Share

दुहेरी नागरिकत्व संबंधित प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी सुनावणी दरम्यान हे आदेश दिले आहेत.कार्टाने म्हटले आहे की या प्रकरणात तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई होईल. नागरिकत्वासंबंधित होणाऱ्या आरोपासंदर्भात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्व ठेवण्याचा आरोप लावण्यात आले होते. या मुद्यावरुन हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. सुनावणीनंतर कोर्टाने एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने आज आदेश दिला की लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या जवळ दुहेरी नागरिकत्वाचा होत असलेल्या आरोपा संदर्भात चौकशी व्हायला हवी. कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला निर्देश दिले की त्यांनी स्वत: तपास करावा वा हे प्रकरण कोणा सेंट्रल एजन्सीला सोपवून तपास करावा.

स्पेशल MP/MLA कोर्टाच्या आदेशाला आव्हान

हा आदेश भाजपा कार्यकर्ता एस.विग्नेश शिशिर यांच्या याचिकेवर आला आहे. ज्यात त्यांनी लखनऊच्या एका स्पेशल MP/MLA कोर्टाच्या २८ जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिले होते. ज्यात काँग्रेस नेत्या विरोधात एफआयर दाखल करण्याची त्यांची याचिका फेटाळली होती. खालच्या कोर्टाने म्हटले होते की ते नागरिकत्वाच्या संबंधित प्रकरणाचा निर्णय करण्यास सक्षम नाही.

कर्नाटक येथे राहणाऱ्या याचिकाकर्त्याने भारतीय न्याय संहिता(BNS), ऑफिशियल सिक्रेट्स एक्ट, फॉरेनर्स एक्ट आणि पासपोर्ट एक्ट अंतर्गत आरोप लावत एफआयआर नोंदवणे आणि डिटेलमध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार सुरुवातीला रायबरेलीच्या एका स्पेशल MP/MLA कोर्टात दाखल करण्यात आली होती. १७ डिसेंबर २०२५ रोजी हायकोर्टाने केस लखनऊ येथे ट्रान्सफर केली. लखनऊ कोर्टात याचिका फेटाळल्यानंतर याचिकाकर्त्याने हायकोर्टात धाव घेतली होती.

कोर्टाचे आदेशाचे विग्नेश शिशिर याने केले स्वागत

भाजपा कार्यकर्ता एस. विग्नेश शिशिर यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहीलेय की एका लँड मार्क आणि ऐतिहासिक निकालात अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ बेंचने माझ्या पिटीशनला मंजूरी दिली आहे. आणि उत्तर प्रदेशाच्या रायबरेली जिल्ह्याच्या पोलिस ठाण्याला ब्रिटीश सिटीजनशिप केसमध्ये राहुल गांधी, लोकसभा सदस्य आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

पुढे त्यांनी लिहिलंय की अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ बेंचचे मी हृदयापासून आभार मानत आहे आणि नॅशनल सिक्युरिटी आणि मोठ्या पब्लिक इंटरेस्टमध्ये सत्य समोर आणण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ बेंचचे आभार मानत आहे.

त्याने लिहिलंय की आता जेव्हा अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ बेंचने राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश आणि निर्देश दिले आहेत. मला तपासाच्या प्रक्रियेत उत्तर प्रदेश पोलिसांना मदत करावी लागत आहे. कारण मला आतापर्यंत सर्वाधिक सिक्युरिटी थ्रेटचा सामना करावा लागत आहे. मी गृहमंत्रालयाला विनंती करत आहे की माझ्या सुरक्षेत लागलीच वाढ करण्यात यावी.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...