Railway Ticket Rule: स्लीपरच्या तिकिटावर AC कोचचा प्रवास? ट्रिक तरी काय?
Railway Ticket Rule: भारतीय रेल्वेने प्रवास करणारे लाखो प्रवासी आहेत. अनेकदा लांब पल्ल्यासाठी स्लीपर तिकीट बुक केल्या जाते. पण उन्हाळ्यात एसी कोचचा मोह सुटत नाही. स्लीपर कोचच्या तिकीटावर एससी कोचमधून प्रवास करता येतो का? त्यासाठी रेल्वेचे हे ऑटो अपग्रेडेशन फीचर मदतीला धावते.

Railway Ticket Rule: देशात लांबच्या प्रवासासाठी आजही रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. लांब पल्ल्यासाठी स्लीपर कोचचे तिकीट बुक करण्यात येते. पण उन्हाळ्यात एस कोच मिळाला तर अनेकांना हायसे वाटते. तर अनेकांना एससी कोचने प्रवास करावा वाटतो. स्लीपर कोचचे तिकीट बुक केल्यावर एससी कोचमधून प्रवास करता येतो का? तर त्याचे उत्तर होय असे आहे. त्यासाठी ऑटो अपग्रेडेशन फीचर तुमच्यासाठी कामाला येते. या ऑटो अपग्रेडेशन फीचरच्या मदतीने तुम्ही स्लीपर क्लास तिकीट बुक केल्यावरही एसी क्लासचा प्रवास करू शकता. त्यासाठी काय करावे लागते?
ऑटो अपग्रेडेशन फीचर आहे तरी काय?
ऑटो अपग्रेडेशन फीचर भारतीय रेल्वेचे एक फीचर आहे. जे तिकीट बुकिंग करताना कामी येईल. या फीचर अंतर्गत विना अतिरिक्त रक्कम देता तुम्हाला तुमचे तिकीट उच्च श्रेणीसाठी अपग्रेड करता येईल. म्हणजे स्लीपर कोचचे तिकीट एसी कोच तिकीटात बदलता येईल. त्यासाठी ऑटो अपग्रेडेशन फीचरचा वापर करता येईल.
ऑटो अपग्रेडेशन फीचर काम करते कसे?
हे फीचर प्रवाशांना IRCTC या अधिकृत साईट वा ॲपवर तिकीट बुक करताना दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यावर तिथे तुम्हाला ऑटो अपग्रेडेशन फीटर मिळेल. याठिकाणी ऑटो अपग्रेडेशन फीचरचा लाभ घेता येईल.
ऑटो अपग्रेडेशन फीचरचा केव्हा मिळतो लाभ?
ऑटो अपग्रेडेशन फीचरचा लाभ घेता येतो हे जरी खरं असली तरी त्यासाठी एससी कोचमध्ये सीट उपलब्ध असणे, आसन व्यवस्था अधिक असणे आवश्यक आहे. म्हणजे जर एससी कोचमध्ये आसान उपलब्ध असेल तर तुम्हाला लागलीच तिकीट अपग्रेडशन करता येते. ही सुविधा केवळ एसी क्लाससाठी मर्यादीत आहे.
ऑटो अपग्रेडेशन फीचरचा लाभ केव्हा नाही मिळत?
जर रेल्वे प्रवासात वेटिंग लिस्ट नसेल. तर मग ऑटो अपग्रेडेशन फीचरचा लाभ घेता येत नाही.
त्यामुळे ज्या श्रेणीत तुम्ही तिकीट बुकिंग केले, त्याच श्रेणीत तुम्हाला सीट घ्यावी लागते.
ऑटो अपग्रेडेशन ही प्रक्रिया पूर्णपणे वेटिंग लिस्टच्या परिस्थितीवर अवलंबून आहे.