AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP : ‘अमेरिका-पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील’, भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

BJP Leader on Pakistan-US War : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत तीनवेळा त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला आहे. आधी सर्जिकल स्ट्राइक केला, नंतर एअर स्ट्राइक त्यानंतर ऑपरेशन सिंदूर केलं. पण भाजपच्या एका प्रदेशाध्यक्षाने अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तो म्हणतो, 'अमेरिका-पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास आम्ही पाकिस्तानच्या बाजूने उभे राहू',

BJP : 'अमेरिका-पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील', भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
Shenbaz Sharif-Donald TrumpImage Credit source: PTI
| Updated on: Oct 16, 2026 | 8:48 AM
Share

राजस्थान भाजपचे अध्यक्ष मदन राठौड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुरुवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. “जर, भविष्यात अमेरिका-पाकिस्तानमध्ये युद्ध झालं, तर भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिलं. कारण ते आमचे शेजारी आहेत” मदन राठौड यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आपल्या सगळ्यांना हे समजून घेण्याची गरज आहे की, जर अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर आम्ही पाकिस्तानच्या बाजूने आहोत. कारण ते आमचे शेजारी आहेत” असं राजस्थान भाजपचे अध्यक्ष मदन राठौड म्हणाले.

‘आपसात काही विषय असेल तर त्यांनी भारतासोबत राहिलं पाहिजे’ त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावरुन राजकीय वादविवाद सुरु झालाय.काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते शमा मोहम्मद यांनी मदन राठौड यांच्या वक्तव्यावर टीका केली. “पाकिस्तान एक दहशतवादी देश असून त्यांच्यापासून भारताचे सैनिक आणि सर्वसामान्य लोकांना धोका आहे” असं शमा मोहम्मद म्हणाल्या. “भाजप अध्यक्षांच्या वक्तव्यासोबत पक्ष सहमत नसेल, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल का?” असा शमा मोहम्मद यांनी प्रश्न विचारला. शमा मोहम्मद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक संदीप गुप्ता यांनी सोशल मीडियावर राठौड यांच्या वक्तव्यावर टीका केली. यावरुन भाजपची पाकिस्तान बद्दलची भूमिका समोर येते असा आरोप त्यांनी केला. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी सुद्धा मदन राठौड यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. दिल्ली आप युवा विंगचे प्रदेश अध्यक्ष रमेश मटियाला आणि पार्टीचे नेते विनय महाबल मिश्रा यांनी व्हिडिओ पोस्ट केला. AAP उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष राम गुप्ता यांनी सुद्धा मदन राठौड यांच्या वक्तव्यावर टीका केली. भाजपं आणि पाकिस्तानच्या विचारधारेत समानता असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपची प्रतिक्रिया काय?

मदन राठौड यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादळ आलं आहे. अमेरिका-पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास आम्ही पाकिस्तानच्या बाजूने जाऊ हे वक्तव्य या वादाच्या मूळाशी आहे. मदन राठौड यांच्या वक्तव्यावर भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!