Tigress Ragini : रागिणीचा रंगच न्यारा! रविवारी 3 पिल्ल जन्माला घातली, तिघांकडेही पाहून म्हणाल, ‘रंग यांचा वेगळा’

या वाघिणीच्या एका बछड्याचा रंग त्याच्या वडिलांप्रमाणे काळा आणि पांढरा आहे.

Tigress Ragini : रागिणीचा रंगच न्यारा! रविवारी 3 पिल्ल जन्माला घातली, तिघांकडेही पाहून म्हणाल, 'रंग यांचा वेगळा'
निसर्गाचा अद्भूत चमत्कारImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 1:52 PM

मुंबई : ‘कुदरत का करीश्मा’ (Natural Magic) कशाला म्हणतात, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. सफेद वाघिणीनं (White Tigress) तिघा पिल्लांना जन्म दिला. चकीत करणारी बाब म्हणजे तिघांचाही रंग एकमेकांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे सुरेश भट स्टाईलमध्ये या पिल्लांकडे पाहून रंग माझा वेगळा असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खरोखरच यांचा रंग वेगळा असल्यानं प्राणी प्रेमींनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. पांढरी वाघिण म्हणून प्रसिद्ध असलेल्या रागिणीने (Tigress Ragini) कमला नेहरु प्राणिसंग्रहालयामध्ये तिघा बछड्यांना जन्म दिला. रागिणी वाघिणीची ही प्रसूती हा एक दुर्मिळ क्षण होता. कारण यावेळी तिच्या पोटातून जन्माला आलेल्या तिघाही पिल्लांकडे निसर्गाचा एक चमत्कार म्हणूनच पाहिलं जातंय. तिघाही बछड्यांचा रंग वेगवेगळा कसा, असा प्रश्न काहींना यामुळे पडलाय.

निसर्गाचं सौंदर्य

एनिमल एक्सचेज प्रोग्रॅमच्या अंतर्गत रागिणी वाघिणीला ओडिशातून इंदौरमध्ये आणण्यात आलं होतं. त्यानंतर तिनं पहिल्यांच तीन बछड्यांना जन्म दिला आहे. चार वर्षांपूर्वी विकी विकी नावाच्या मेलेनिस्टिक वाघाशी रागिणी वाघासोबत संबंध झाले होते. त्यानंतर तिने आता तिघा गोंडस बछड्यांना जन्म दिला आहे. या वाघांचे फोटोही अत्यंत आकर्षक असे आहेत. प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून याबाबती माहिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

या वाघिणीच्या एका बछड्याचा रंग त्याच्या वडिलांप्रमाणे काळा आणि पांढरा आहे. तर इतर दोन काळ्या पांढऱ्या आणि केशरी या तीन रंगाच्या मिश्रणात दिसून आले आहे. अत्यंत दुर्मिळ असे रिसेसिव्ह स्वरुपाचे जीन्स या वाघांमध्ये आढळल्यानं त्यांचा रंग हा अतिदुर्मिळ प्रजातींप्रमाणे दिसून आला आहे. पांढऱ्या वाघांची निर्मिती ही अनुवांशिक फ्लूकमुळे होते, असं जाणकार सांगतात.

द वेदर चॅनेल कडून या वाघांचे फोटोही जारी करण्यात आले आहे. बीसीसीएल इंदूरचे प्रवीण बरनाळे यांनी वाघाचे अत्यंत आकर्षक असे फोटो टिपले असून बछड्यांच्या जन्माला वाघिण पिल्लांवर माया करताना कॅमेऱ्याक कैद झाली आहे. रविवारी या वाघिणीची प्रसूती झाली होती. या वाघिणीच्या एका पिल्लाचा रंग सफेद, दुसऱ्या मेलनिस्टीक आणि तिसऱ्याचा मिक्स कलर असल्याचं दिसून आलं आहे.

Non Stop LIVE Update
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.