Republic Day 2023 : स्वातंत्र्यानंतर पहीली परेड कधी आणि कुठे झाली

संपूर्ण देशात आज 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजच्या दिवशी सर्वात मोठे आकर्षण असते ते दिल्लीतील कर्तव्यपथावरील पथसंचलन होय.परंतू परेडची सुरूवात नेमकी कधी झाली हे जाणायला तुम्हाला आवडेल

Republic Day 2023 : स्वातंत्र्यानंतर पहीली परेड कधी आणि कुठे झाली
paredImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 3:46 PM

दिल्ली : देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर ( राजपथ ) प्रसिद्ध असलेल्या पथसंचलनात देशाच्या वैभव आणि संस्कृतीचे विलोभनीय दर्शन जगाला झाले. यंदा महाराष्ट्राचा नारी शक्ती या थीम अंतर्गत  आदिमायाच्या साडेतीन शक्तीपीठांचा देखणा चित्ररथ सादर केला गेला. परंतू कर्तव्यपथावरील पहीले संचलन ( PARED ) झाले याबाबत उत्सुकता असेल तर ही माहिती महत्वाची आहे. देशात 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले. त्यानंतर आपण प्रजासत्ताक झालो. परंतू परेडची सुरूवात नेमकी कधी झाली. तसेच सांस्कृतिक चित्ररथांचा समावेश देखील कधी झाला हे जाणायला तुम्हाला आवडेल.

गणतंत्र परेडबद्दल जाणूयात..

संविधान लागू झाल्यानंतर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतल्यानंतर दिल्लीच्या जुन्या किल्ल्या जवळील इर्विन (Irwin ) स्टेडीयमवर पहिल्यांदा ध्वजसंचलन झाले होते. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन सलामी देण्यात आली होती. त्यानंतर परेड झाली होती. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गर्व्हनर जनरल सी राजगोपालाचारी हेही उपस्थित होते. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, इरविन स्टेडीयमचे नामकरण आधी नॅशनल आणि नंतर मेजर ध्यानचंद स्टेडीयम असे ठेवण्यात आले होते.

President Leaving Irwin Stadium Dr. Rajendra Prasad on his way back to Rashtrapati Bhavan after the celebration was over.

President Leaving Irwin Stadium Dr. Rajendra Prasad on his way back to Rashtrapati Bhavan after the celebration was over.

देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन आणि परेडचे इर्विन स्टेडीयम मध्ये संचलन झाले. त्यानंतर या परेडचे आयोजन लाल किला, किंग्‍सवे कॅंप, रामलीला मैदान झाले. अखेर साल 1955 मध्ये प्रथमच राजपथावर परेडचे आयोजन झाले. ज्यानंतर आतापर्यंत याच राजपथावर परेडचे आयोजन होत आले आहे. हा पथमार्ग तब्बल पाच किमी पेक्षाही मोठा आहे.

A 31 Gun Salute-26JAN1950

A 31 Gun Salute-26 JAN 1950

राष्ट्रपती भवनाजवळ रायसीना हील येथून हा मार्ग सुरू होत इंडिया गेटमधून हा मार्ग थेट लाल किल्ल्यावर जाऊन संपतो. 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिनी जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी इर्विन स्टेडियमवर तिरंगा फडकवला तेव्हा त्यांना 30 तोफांची सलामी देण्यात आली. आता 21 तोफाची सलामी दिली जात असते. भारतीय लष्कराच्या सात विशेष तोफांमधून ही सलामी दिली जाते. या तोफांना Ponders म्हणतात. 1941 मध्ये पोंडर्स तोफ बनवण्यात आल्या. लष्कराच्या सर्व औपचारिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा समावेश करण्याची प्रथा आहे. तो कधीही बदलला नाही.

Dr. Rajendra Prasad

Dr. Rajendra Prasad

या कार्यक्रमात केवळ देशातून नाहीत तर जगभरातून खास पाहुण्यांना आमंत्रित केले जात असते. हजारो लोक राजपथवर पोहोचतात. देशाचे सामर्थ्य, शौर्य, विकास आणि विविध सांस्कृतिक तिचे जगाला दर्शन घडविण्यासाठी परेड आयोजित केली जाते. यादरम्यान, तिन्ही सैन्य दलांसह एनसीसी आणि विविध दलांचे सैनिक परेडमध्ये भाग घेतात. 26 जानेवारी 1953 रोजी प्रथमच सैन्यांसह आणि इतर दलांसोबत राज्यांच्या संस्कृतीची झलकही परेडमध्ये समाविष्ट करण्यात आली. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 23 चित्ररथ दाखवण्यात आले.

Rashtrapati Bhavan to the IRWIN amphitheater

The new President took a slow, ceremonial ride from Rashtrapati Bhavan to the amphitheater, New Delhi, in 1950.

संपूर्ण देशात आज 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजच्या दिवशी सर्वात मोठे आकर्षण असते ते दिल्लीतील कर्तव्यपथावरील पथसंचलन होय. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात.

Parade Near Old Fort

Parade Near Old Fort The first Republic Day only saw a military parade in the backdrop of the Purana Qila at the Irwin Stadium.

प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व राज्य चित्ररथांच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. या वर्षा महाराष्ट्राने चित्ररथातून साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला होता. या महाराष्ट्राच्या या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Irwin Stadium Security personnel on the roof of the Irwin Stadium during the parade.

Irwin Stadium Security personnel on the roof of the Irwin Stadium during the parade.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.