AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking : मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा, विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत सर्वात मोठी अपडेट

युक्रेनमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. अशी आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत रशियाने मोठा अलर्टही दिला आहे.

Big Breaking : मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा, विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत सर्वात मोठी अपडेट
मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चाImage Credit source: ANI
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 02, 2022 | 10:51 PM
Share

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनच्या युद्धात (Russia Ukraine war) अनेकांचा बळी जातोय. अनेक भारतीय विद्यार्थी (Indian Students in Ukraine) सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार धावपळ करत आहे. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत पंतप्रधान मोदी (Pm Modi And Putin) आणि पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. अशी आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत रशियाने मोठा अलर्टही दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. मोदींनी युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला, विशेषत: खार्किवमध्ये जेथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्या भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत चर्चा केली. अशी माहिती एएन आय या वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

भारतीयांना बाहेर काढण्याचं आव्हान

हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना यूक्रेनमधून सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याचं आव्हान भारत सरकारपुढे आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दरम्यान, यूक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीयांपैकी आतापर्यंत 6 हजार जणांना मायदेशी परत आणण्यात यश आलंय. तर 17 हजार भारतीय नागरिकांनी यूक्रेनची सीमा सोडली आहे. तशी माहिती MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलीय.

मोदींची तातडीची बैठक

मोठा हल्ला होण्याची शक्यता

रशियानं यूक्रेनवर आक्रमण केलंय त्याला आता 7 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. कीव हे राजधानीचं शहर अद्याप रशियाच्या पूर्णपणे ताब्यात आलेलं नाही. कीव अद्यापही ताब्यात येत नसल्यानं रशिया अस्वस्थ आहे. रशिया आज कीव शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ला करु शकतं. याशिवाय खारकीव शहरावरही रशियाला कब्जा मिळवायचा असल्यानं खारकीवमध्ये मोठे हल्ले रशियन फौजांकडून केला जाण्याची शक्यता आहे.

Russia Ukraine War : भारताला मिळणाऱ्या शक्तीशाली ब्रम्हास्त्राला अमेरिकेचा खोडा? कसं आहे s-400 मिसाईल?

Kharkiv : रेल्वे, बस, जे मिळेल त्या वाहनानं किंवा पायी खारकीव सोडा, भारतीय दुतावासाचं तातडीचं आवाहन

रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर होईल गंभीर परिणाम, 30% पर्यंतचा निचांक गाठू शकतो शेअर बाजार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली