रशियन मॅडम बिहारी राहुलच्या प्रेमात, ज्युली म्हणते मी त्याच्याशिवाय…आता लग्न करून झोपडीत राहणार!
ज्युली तिच्या संपूर्ण कुटुंबासोत बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात पोहोचली आहे. राहुलचे घर अगदी साधे आहेत. तो साद्या झोपडीत राहतो. परंतु तरीदेखील अशा स्थितीत ज्युली राहुलसोबत राहायला तयार आहे.

Russian Girl And Bihari Boy Love Story : प्रेम कधी कुणावर होईल सांगता येत नाही. प्रेमाला देशाच्या, जगाच्या सीमा नसतात. एखाद्या व्यक्तीवर जीव जडला की तिच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. संबंधित व्यक्त परदेशातील, परराज्यातील किंवा अंतरधर्मीय असली तरीही प्रेमात पडलेली व्यक्ती बेभान होऊन तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असते. कशाचीही मर्यादा न पाळता किंवा कुठलेही बंधन न जुमानता आपल्या प्रिय व्यक्तीसाठी जीवाचं रान केलेली अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. आता तर इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे जग खूपच जवळ आलंय. भाषेचा किंवा इतर कुठलाही अडथळा असला तरीही आजकाल तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतायत. सध्या असाच एक अजब आणि गजब किस्सा समोर आलाय. गोरीपान आणि अगदी सुंदर दिसणारी रशियन तरुणी बिहार राज्यातील एका सामान्य आणि गरीब तरुणाच्या प्रेमात पडलीय. त्यांच्या प्रेमाची गोष्ट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलीय.
प्रेम नेमकं कसं जुळलं?
समोर आलेल्या माहितीनुसार रसियातील ज्युली नवाची तरुणी बिहारमधील राहुल यादव नावाच्या सामान्य तरुणाच्या प्रेमात पडली आहे. राहुल रशियात कामानिमित्त गेला होता. रशियात गेल्यानंतर राहुल ज्युलीच्या संपर्कात आला. अगोदर या दोघांमध्ये ओळख झाली. ओळखीनंतर घट्ट मैत्री झाली. आता दोघेही एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल रशियातून भारतात परतला. आपला प्रियकर जवळ नसल्यामुळे ज्युलीला रशियात करमत नव्हते. शेवटी ज्युली तिच्या संपूर्ण कुटुंबासोबतच भारतात आली आहे.
लग्न जुळलं, लवकरच…
ज्युली तिच्या संपूर्ण कुटुंबासोत बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात पोहोचली आहे. राहुलचे घर अगदी साधे आहेत. तो साद्या झोपडीत राहतो. परंतु तरीदेखील अशा स्थितीत ज्युली राहुलसोबत राहायला तयार आहे. विशेष म्हणजे ज्युलीच्या घरच्यांनीही तिला राहुलसोबत राहण्यास संमती दिलीय. ज्युली आणि राहुलच्या कुटुंबीयांमध्ये लग्नाबाबत औपचारिक बोलणं झालं आहे. दोन्ही कुटंबीयांनी लग्नासाठी होकार दिलाय. आता ज्युली आणि राहुल लग्नबंधनात अडकणार आरहेत. नव्हेंबर महिन्यात या दोघांचे लग्न होणार आहे. रशियाची मॅडम बिहारी बाबूच्या प्रेमात पडल्याने या लव्हस्टोरीची देशभरात चर्चा होतेय.