Mohammed Siraj: सलग दुसऱ्यांदा संघातून वगळलं, मैदानातच रडू लागला मोहम्मद सिराज, पाहा Video
IND vs NZ 2nd Test: भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून संघातून पुन्हा एकदा मोहम्मद सिराजला वगळण्यात आले आहे. यानंतर सिराजबद्दल एक बाब समोर आली आहे.

IND vs NZ 2nd TEST Match: भारत न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्याचा पहिला दिवस आता संपला आहे. सामन्याला सुरुवात होताच एका गोष्टीने लक्षवेधलेले पाहायला मिळाले. भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हनची जोरदार चर्चा रंगत आहे. मोहम्मद सिराजला वगळल्यामुळे अनेकांनी कर्णधार शुभमन गिलवर आपली नाराजी दर्शवली. प्रसिद्ध कृष्णाला संघाच्या बाहेर केलं पण त्याच्या जागी गिलने मित्राला पदार्पण दिले. गुरनूर ब्रारला डेब्यू कॅप मिळाली.
सिराजला संघात जागा न मिळाल्याने तो निराश दिसला. त्याला खूप वाईट वाटल्याने तो रडत असल्याचे माजी क्रिकेटर मुरली कार्तिक यांनी म्हटलं. नाणेफेकीनंतर सिराज मैदानावर चष्मा लावलेला दिसला आणि भारताचा माजी फिरकी गोलंदाज मुरली कार्तिकने त्याच्या स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्याने सिराजची बाजू घेतली आणि म्हटले की, अंतिम ११ खेळाडूंमध्ये निवड न झाल्याचा सिराजला नक्कीच पश्चात्ताप होत असेल.
Ajiyanka Rahane said – “Mohammed Siraj is crying”. 💔
Murli Karthik said – “Looking at the visuals, it certainly seems that way.”
Wait for Mohammad Siraj he is truly holding backs his emotion 😭🙏 https://t.co/NV92TBN911
— VIKAS (@Vikas662005) November 27, 2026
‘सिराज रडतोय का?’
कार्तिकने असाही अंदाज वर्तवला की सिराज रडत होता. सिराजकडे पाहून कार्तिकला वाटले की तो कदाचित आपले अश्रू चष्म्यामागे लपवत असावा. ते म्हणाला, “तो रडतोय का? कारण तो एक भावनिक व्यक्ती आहे. काही लोकांना संघातून वगळल्यावरही काही वाटत नाही, पण काही लोकांना खरोखरच खेळायचे असते. त्यांना पायाची दुखापत असो वा डोकेदुखी, ते त्याची पर्वा करत नाहीत. ते आपले सर्वस्व पणाला लावतात. सिराज असाच एक खेळाडू आहे.”
ते पुढे म्हणाला, “कधीकधी आपण आपल्या मनातील वेदना लपवतो. त्याला एकदिवसीय संघातूनही वगळण्यात आले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला प्राधान्य दिले गेले नाही. यामुळे खेळाडू नाराज होतो. जर त्याचा फॉर्म चांगला नसेल, तर तुम्ही त्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी का निवडले?”
आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या चक्रात सिराज भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. असे असूनही, संघ व्यवस्थापनाने त्याला पहिल्या कसोटीसाठी निवडले नाही. संघाच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यानंतर तो दुसऱ्या सामन्यात खेळेल असे वाटले होते, पण सिराजला दुसऱ्या सामन्यातूनही वगळण्यात आले आणि पुन्हा एकदा व्यवस्थापनाच्या निर्णयावर टीका होत आहे.
