... म्हणून सचिन तेंडुलकरकडून या तरुणींचं कौतुक

लखनौ (उत्तरप्रदेश) : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आज अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. मात्र सचिनने आज सर्वात अनोखा विक्रम केला आहे. सचिनने पहिल्यांदाच दोन मुलींच्या हातून आपली दाढी केली आहे. नेहा आणि ज्योती असं या दाढी करणाऱ्या दोन मुलींची नावं आहेत. सचिनच्या या कामगिरीमुळे आज संपूर्ण देशभरात त्याचे कौतुक केलं जात …

... म्हणून सचिन तेंडुलकरकडून या तरुणींचं कौतुक

लखनौ (उत्तरप्रदेश) : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आज अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. मात्र सचिनने आज सर्वात अनोखा विक्रम केला आहे. सचिनने पहिल्यांदाच दोन मुलींच्या हातून आपली दाढी केली आहे. नेहा आणि ज्योती असं या दाढी करणाऱ्या दोन मुलींची नावं आहेत. सचिनच्या या कामगिरीमुळे आज संपूर्ण देशभरात त्याचे कौतुक केलं जात आहे.

न्हावी व्यवसायात आतापर्यंत सर्वाधिक पुरुषांचे वर्चस्व आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या बनवारी तोला गावातील नेहा आणि ज्योती या दोघीं बहिणींनी वडील आजारी असल्यामुळे स्वत: दुकान सांभाळण्याचा निर्णय घेतला. पण सुरुवातीला त्यांच्याकडून कुणी दाढी आणि केस कापण्यासाठी तयार होत नव्हते.

जिलेट इंडिया कंपनीने नेहा आणि ज्योतीची प्रेरणादायी कथा जाहिरातीतून आपल्या सर्वांसमोर आली. यामुळे ही जाहिरात देशभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि पाहिली गेली. यूट्यूबवर ही जाहिरात तब्बल 1.60 कोटी लोकांनी पाहिली आहे. यानंतर सचिन तेंडुलकरने या दोघींच्या हातून दाढी करण्याचा निर्णय घेतला. तेंडुलकरने हे फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

“तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण मी कधी कुणाकडून दाढी करुन घेतली नाही, आज हा विक्रम तुटला, या मुलींना भेटणे म्हणजे सन्मानाची गोष्ट आहे”, असं सचिनने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

सचिनने जिलेट स्कॉलरशिपही या मुलींना दिली आहे. यामध्ये त्या शैक्षणिक आणि व्यवसायातील गरजा पूर्ण करु शकतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *