वाढदिवसाला जाण्यासाठी शर्ट सापडला नाही, अशी उघड झाली सावत्र आईची क्रूरता

| Updated on: May 16, 2023 | 9:59 AM

ज्यावेळी तो मुलगा तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेला, त्यानंतर पोलिसांनी त्याचा संपुर्ण चौकशी केली. त्याचवेळी पोलिसांना समजलं की तो मुलगा आपल्या मजदूर वडील मल्लिकार्जुन राव (40) यांच्यासोबत राहतो.

वाढदिवसाला जाण्यासाठी शर्ट सापडला नाही, अशी उघड झाली सावत्र आईची क्रूरता
delhi police
Image Credit source: tv9marathi
Follow us on

नवी दिल्ली : आंध्रप्रदेश (Andra pradesh) राज्यातील एका मुलाने आपल्या आईच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये (police) तक्रार दाखल झाली आहे. दोस्ताच्या वाढदिवसाला पार्टीला जाण्यासाठी पांढरं शर्ट न दिल्यामुळे तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे त्याच्या सावत्र आईची क्रूरता (Cruelty of the stepmother) समोर आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तो मुलगा सरकारी शाळेतील असून पाचवीच्या वर्गात शिकत आहे. त्या विद्यार्थ्यांचं वय (11) आहे. रविवारी दुपारी तो 11 वाजता आपल्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी तयार होत होता. मित्राच्या पार्टीसाठी पांढऱ्या रंगाचं घालणार होता.

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने आपल्या सावत्र आईला लक्ष्मी (38) कपडे देण्यास सांगितले. त्याला शर्टला इस्त्री झाली होती. परंतु आईने शर्ट देण्यास मनाई केली. त्यानंतर तो मुलगा अर्धनग्न अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला आहे.

ज्यावेळी तो मुलगा तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेला, त्यानंतर पोलिसांनी त्याचा संपुर्ण चौकशी केली. त्याचवेळी पोलिसांना समजलं की तो मुलगा आपल्या मजदूर वडील मल्लिकार्जुन राव (40) यांच्यासोबत राहतो. त्या वडिलांनी त्याच्या आईच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न केलं आहे.

हे सुद्धा वाचा

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांनी त्यानंतर त्या मुलाच्या सावत्र आईला तात्काळ बोलावून घेतलं. चौकशी दरम्यान लक्ष्मी याच्या आगोदर सुध्दा चुकीच्या पद्धतीने वागली आहे. तिने त्या मुलाला मारहाण केली आहे त्याचबरोबर शरीराला चटके सुद्धा दिले आहेत. त्या मुलाच्या सावत्र आईने त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण केली आहे की, त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. लक्ष्मी नावाच्या त्याच्या आईने त्याचा पाय सुद्धा भाजला आहे.

अधिकाऱ्यांच्या हे सगळं लक्षात आल्यानंतर त्यांनी लक्ष्मीला अशा पद्धतीने वागण्याबाबत अंतिम समज दिली आहे. तिच्याकडून अशा पद्धतीने पोलिसांनी सगळं लिहून घेतलं आहे. यानंतर ती मुलाला कसल्याही प्रकारचा त्रास देणार नाही.