AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम वांगचुक यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; आता खासगी रुग्णालयात होणार उपचार, कोर्टात काय युक्तिवाद झाला?

सोनम वांगचुक यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना सरकारीमधून आता खासगी रुग्णालयात दाखल करण्यास परवनागी दिली आहे.

सोनम वांगचुक यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; आता खासगी रुग्णालयात होणार उपचार, कोर्टात काय युक्तिवाद झाला?
| Updated on: Jul 21, 2026 | 2:42 PM
Share

कॉक्रोच जनता पक्षाच्या समर्थनात उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावणरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सोनम यांना सरकारी रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांची खास टीमही तयार करण्यात येणार आहे. त्या टीमकडून मेडिकल रिपोर्ट देखील घेतले जाणार आहेत.

सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून हलविण्याबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी हायकोर्टात सोनम वांगचुक यांचं नवीन आरोग्याचा अहवाल सादर केला. सरकारी वकिलांनी म्हटलं की, आम्हाला सोनम यांना मेदांता रुग्णालयात दाखल करणयावर कोणताही आक्षेप नाही. सफदरजंग रुग्णालयात आतापर्यंत करण्यात आलेले उपचार, रिपोर्ट, इतर कागदपत्रे देखील मेदांता रुग्णालयाला उपलब्ध केले जातील. परंतु डिस्चार्ज हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होईल.

हायकोर्टचे न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश तेजस कारिया यांच्या खंडपीठाने हा महत्वाचा निर्णय घेतला. दिल्ली हायकोर्टात सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टर आणि सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने निर्णय घेतला. सरकारी वकिलांनी सांगितलं की, ‘सोनम वांगचुक यांच्यासोबत असणार्‍यांना त्यांना हॉस्पिटलमधून बाहेर काढायचं आहे. परंतु सोनम वांगचुक हे त्यांच्या पसंतीचं रुग्णालय आणि डॉक्टर निवडू शकतात. परंतु डिस्चार्ज हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देण्यात यावा. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल केले पाहिजे. परंतु सोनम हे रुग्णालयातून जंतर-मंतरवर गेले. तिकडे जाऊन उपोषणाला काही झालं, तर त्याला कोण जबाबदार राहील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारी वकिलांनी पुढे सांगितलं की, ‘केंद्र सरकार सोनम वांगचुक यांच्या आरोग्याबाबत कोणतीही जोखीम घेऊ शकत नाही. त्यांची तब्येतीवर परिणाम झाल्यास त्याचा परिणाम थेट सरकारवर होईल’. त्यानंतर कोर्टाने म्हटलं की, ‘मेडिकल रिपोर्टनुसार, सोनम वांगचुक यांच्या आरोग्याावर देखरेख ठेवण्याची गरज आहे.सफदरजंग रुग्णालय आणि मेदांता रुग्णालयातही त्यांच्या आरोग्यावर देखरेख केली जाऊ शकते. त्यांच्यावर दोन्ही ठिकाणी उपचार झाले, तर डॉक्टरांनी त्यांच्यावर देखरेख ठेवली गेली, तर त्यांना मेदांता रुग्णालयात हलविता येईल’.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...