AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: उत्तर प्रदेशात ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी, किंचाळ्या आणि गोंधळ; सुदैवाने मोठी हानी टळली

पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही लडकी हूँ, लड सकती हूँ ही मोहीम हाती घेतली आहे.

VIDEO: उत्तर प्रदेशात 'लडकी हूँ, लड सकती हूँ' मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी, किंचाळ्या आणि गोंधळ; सुदैवाने मोठी हानी टळली
Stampede
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 3:36 PM
Share

बरेली: उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही लडकी हूँ, लड सकती हूँ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत बरेलीत मुलींसाठी एका मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचंड चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक मुली दबल्या गेल्या. त्यामुळे किंचाळ्या आणि गोंधळामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही.

सोमवारी बरेलीत बिशप मंडल इंटर कॉलेजातील मैदानावर सकाळी 10 वाजता धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रियंका गांधी यांच्या लडकी हूँ, लड सकती हूँ या मोहिमेंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र, स्पर्धा सुरू होताच काही वेळात एका मुलीचा दुसऱ्या आणि दुसऱ्या मुलीचा तिसरीला धक्का बसला. त्यामुळे काही मुली खाली पडल्या. त्यानंतर पाठीमागून आलेल्या मुलींचा लोंढा या मुलींवर कोसळून चेंगराचेंगरी झाली. मुली एकमेकींवर आदळल्यानंतर प्रचंड घाबरल्या होत्या. या मुलींनी एकच आरडाओरड सुरू केली. वाचवा वाचवाचा टाहो केला. या घटनेत अनेक मुली जखमी झाल्या आहेत. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी दुर्देवी घटना घडली नाही.

तीन मुली रुग्णालयात

या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या तीन मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

माजी महापौरांचं धक्कादायक विधान

दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर सुप्रिया ऐरन यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. वैष्णोदेवीच्या मंदिरात चेंगराचेगरी होऊ शकते, ही तर मुलींची गर्दी आहे. ही मानवी दुर्घटना आहे. मात्र, मीडियातील लोकांना झालेल्या धक्काबुक्कीबद्दल मी दिलगीर आहे, असं विधान ऐरन यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, या घटनेमागे काही षडयंत्र असू शकतं. काँग्रेसचा जनाधार वाढत असल्याने हे षडयंत्र रचलं गेलं असावं, असा दावा त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Weekend Curfew | राजधानीत विकेंड कर्फ्यू लागू, नवी नियमावली जारी, नेमकं काय सुरु? काय बंद?

मुस्लीम लॉ बोर्डाचा पुन्हा फतवा, मुस्लीम मुला-मुलींनी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात जाऊ नये !

तामिळनाडूतील तंजावरमध्ये सापडले 500 कोटींचे शिवलिंग, पोलिसांनी केले जप्त

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...