बंगालमध्ये पुन्हा राजकीय हिंसाचार, भाजपच्या बड्या नेत्याच्या रॅलीवर जोडे-चप्पल आणि दगडफेक

| Updated on: Jan 04, 2021 | 6:45 PM

पश्चिम बंगालमधील भाजपचे बडे नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीवर दगडफेक आणि जोडे-चप्पल फेकण्यात आले (Stone and slippers through on Kailash Vijayvargiya road show).

बंगालमध्ये पुन्हा राजकीय हिंसाचार, भाजपच्या बड्या नेत्याच्या रॅलीवर जोडे-चप्पल आणि दगडफेक
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) काही दिवसांपासून राजकीय हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अज्ञात लोकांकडून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आज (4 जानेवारी) पश्चिम बंगालमधील भाजपचे बडे नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीवर दगडफेक आणि जोडे-चप्पल फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे (Stone and slippers through on Kailash Vijayvargiya road show).

तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांच्या मतदारसंघात आज विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात भाजपची रॅली काढण्यात आली. या रॅलीत काही अज्ञातांनी दगडफेक केली. त्याचबरोबर रॅलीवर जोडे आणि चप्पल फेकण्यात आल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. मात्र, तरीदेखील रॅली शांततेत संपन्न झाली. रॅलीवर झालेल्या दगडफेकवरुन भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा दावा केला आहे.

या रॅलीला सुरुवातीला पोलिसांचा विरोध होता. मात्र, भाजप नेत्यांनी विनंती केल्यानंतर रॅलीला अनुमती देण्यात आली. पोलिसांनी सुरुवातीला अनुमती नाकारल्यामुळे या रॅलीला उशिर झाला. या रॅलीत कैलाश विजयवर्गीय यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल राय, खासदार अर्जुन सिंह यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली अलीपूर येथून हेस्टिंग येथील भाजप कार्यालयापर्यंत निघाली होती (Stone and slippers through on Kailash Vijayvargiya road show).

रॅलीनंतर कैलाश विजयवर्गीय यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ममता सरकारवर निशाणा साधला. “आधी पोलिसांनी रॅलीला अनुमती दिली नाही. त्यानंतर हेस्टिंगपर्यंत अनुमती देण्यात आली. प्रशासनाच्या आदेशांचं पालन केलं गेलं आणि एकदम शांततेत रॅली काढण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये कशाप्रकारे तानाशाही सुरु आहे, त्याचं हे ताजं उदाहरण आहे. बंगालमध्ये विरोधी पक्ष राजकीय कामकाज करु शकत नाही. पाच दिवसांपूर्वी अर्ज दिल्यानंतरही रॅलीला अनुमती दिली गेली नाही”, असं विजयवर्गीय यांनी सांगितलं.

“निवडणुकीला आता फक्त चार महिने शिल्लक राहिले आहेत. राजकीय पक्षांना राजकीय वाटचाल करण्यासाठी रोखलं जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या या कार्यप्रणालीचा आम्ही निषेध करतो. आम्हाला राजकीय हिंसाचारा नकोय. आम्ही एका जबाबदार पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही शांततेत राजकारण करु इच्छितो. मात्र, टीएमसी रणनिती बरोबर नाही”, अशी भूमिका कैलाश विजयवर्गीय यांनी मांडली.

याआधी देखील भाजप नेत्यांवर हल्ला

काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते सुदैवाने बचावले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगालच्या दौऱ्यावर असताना त्यांची प्रचारसभा संपल्यानंतर घराकडे निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता कैलास विजयवर्गीय यांच्या रॅलीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; ‘हे’ पाच नेते गेमचेंजर ठरणार?