
दिल्ली : मागच्या आठवड्यापासून काही राज्यात पावसाचं (Weather Forecast Today) वातावरण तयार झालं आहे. दिल्लीत (latest delhi news) सुध्दा ढगाळ वातावरण आहे. ज्यावेळी दिल्लीत पाऊस सुरु होतो, त्यावेळी तिथलं वातावरण (today climate change) पुर्णपणे बदललं जातं. तर कधी गर्मीने लोकांचं हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून दिल्लीत पुन्हा वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाऊस देखील सुरु झाला आहे. पावसामुळे तापमान कमी झालं आहे. भारतीय हवामान खात्याने बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान सह आठ राज्यांमध्ये पुढच्या चार दिवसात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्लीत पुढचे चार दिवस हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आज सगळीकडं ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी सगळीकडं पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज दिल्ली कमी तापमान असल्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात पूर्व आणि पश्चिम भागात पुढचे दोन दिवस पावसाचे वातावरण राहणार आहे. युपीची राजधानी लखनऊमध्ये आज तापमानात चांगलीचं घरसण झाली आहे. शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात पुन्हा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे.
पुढचे तीन दिवस ओडीसा राज्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात सुध्दा सोसट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज छत्तीसगड राज्यात विजेच्या पडण्याच्या घटना घडतील, त्याचबरोबर मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
#WATCH | Delhi witnesses sudden change in weather, receives rainfall pic.twitter.com/e2VjpwTa3x
— ANI (@ANI) September 15, 2023
मध्यप्रदेश राजस्थान आणि जम्मू या राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढचे तीन दिवस गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याचबरोबर हलक्या पावसाची शक्यता देखील आहे. बिहार राज्यात मागच्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला आहे. बिहारची राजधानी पटना येथे पुढच्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे.