सुरतची कंपनीची मोठी घोषणा’; भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारताच्या 750 वीरांच्या घराच्या छतावर मोफत सौर उर्जा यंत्रणा बसवून त्यांची घरे उजळवणार!

| Updated on: Aug 17, 2022 | 1:59 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा “आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत साजरा करण्याचे जे आवाहन केले होते त्यापासून प्रेरणा घेत एसआरकेकेएफ मार्फत, ‘राष्ट्र की रोशनी’ ह्या कार्यक्रमावेळी देशासाठी झटलेल्या अज्ञात वीरांच्या कुटुंबांना मदत करण्याचे आणि सक्षम करण्याचे जे कार्य संस्थेमार्फत सुरु होते.

सुरतची कंपनीची मोठी घोषणा’; भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारताच्या 750 वीरांच्या घराच्या छतावर मोफत सौर उर्जा यंत्रणा बसवून त्यांची घरे उजळवणार!
Follow us on

सुरत: श्री रामकृष्ण एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड (SRL) ह्या हिरे जगतातील अग्रगण्य कंपनीचीच सेवाभावी संस्था असणाऱ्या, एसआरके नॉलेज फाउंडेशन (SRKF) तर्फे सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात, देशभरातील 750 शहीद सैनिकांच्या आणि अज्ञात वीरांच्या घराच्या छतावर मोफत सौर उर्जा यंत्रणा बसवून देण्याची घोषणा करण्यात आली. संस्थापक-चेअरमन श्री गोविंद ढोलकिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या एसआरकेकेएफ मार्फत भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी ‘राष्ट्र की रोशनी’ नावाचा एक कार्यक्रम, एसआरके स्पोर्ट्स पार्क, सुरत येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सकाळी 8 वाजता सुरु झाला. परेड काढून मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे (CRPF) कमांडर चेतन कुमार चिताह यांचे स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा “आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत साजरा करण्याचे जे आवाहन केले होते त्यापासून प्रेरणा घेत एसआरकेकेएफ मार्फत, ‘राष्ट्र की रोशनी’ ह्या कार्यक्रमावेळी देशासाठी झटलेल्या अज्ञात वीरांच्या कुटुंबांना मदत करण्याचे आणि सक्षम करण्याचे जे कार्य संस्थेमार्फत सुरु होते.

या संकल्पामुळे 3000 पेक्षा जास्त व्यक्तींना फायदा

अविरत सुरु ठेवण्याची शपथ घेण्यात आली. या शिवाय त्यांच्या घरावर सौर उर्जा यंत्रणा बसवून देण्याचा संकल्प सुद्धा सोडण्यात आला. या संकल्पामुळे 3000 पेक्षा जास्त व्यक्तींना फायदा होणार असून रात्रंदिवस असणारी त्यांची विजेची गरज पूर्ण होईल. हा संकल्प पूर्ण झाल्यावर, कोणत्याही समाज कल्याण संस्थेमार्फत पार पाडला गेलेला हा अभिनव उपक्रम ठरेल.

पुढील 25 वर्षे होणार मदत

ह्या 750 घरांची विजेची गरज दूर करण्यासाठी 750 किलो-वॅट क्षमतेची सौर उर्जा यंत्रणा घराच्या छतावर बसवली जाईल. यामुळे पुढील 25 वर्षे ह्या कुटुंबांची दर महिन्याला 2000 रुपयांची बचत होईल. एसआरकेकेएफ श्वाश्वत विकास ध्येयपूर्ती (एसडीजी) साठी वेगाने काम करत असून अन्य उपक्रमांपैकी हा उपक्रम म्हणजे हरित भविष्याच्या दिशेने टाकलेले एक छोटेस पाउल आहे.

“हम चले तो हिंदुस्थान चले”

ह्या वर्षी मार्च महिन्यात गोविंदकाका यांनी गुजरात मधील अमरेली जिल्ह्यातील दुधाला ह्या गावात प्रत्येक घरावर सौर उर्जा यंत्रणा बसवून हे गाव हरित ग्राम करण्याची घोषणा केली होती. 2016 साली नदाबेट येथे, आपल्या शूर सैनिकांना सन्मानित करण्यासाठी एसआरकेकेएफ मार्फत “हम चले तो हिंदुस्थान चले” नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता.

आयुष्यभरासाठी उपयोगी

गोविंदकाका म्हणाले, “आपले अज्ञात वीर आपल्यासाठी खूप काही करत आहेत. आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नेहमी आपल्या देशाच्या विकासासाठी आणि वृद्धीसाठी झटले पाहिजे. ह्या भारताचे जबाबदार नागरिक म्हणून, आमचे एसआरके कुटुंब आपल्या ह्या अज्ञात वीरांसाठी नेमके काय करू शकते असा विचार मनात आला. आम्हाला असे काहीतरी करायचे होते जे त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगी ठरेल आणि तेव्हाच आम्हाला सुचले की त्यांच्या घरांना सौर उर्जा यंत्रणा पुरवणेच योग्य मदत ठरेल.”

शाश्वत प्रक्रीयेमुळे एसआरके प्रसिद्ध

गोविंदकाका यांच्या दूरदृष्टीच्या जोरावर आणि त्यांच्या उद्योजक कौशल्यामुळे, एसआरके आज हिरे व्यापार क्षेत्रातील एक मोठे नाव म्हणून पुढे आले आहे. आपल्या जागतिक दर्जाच्या पर्यावरणपूरक सुविधांमुळे आणि शाश्वत प्रक्रीयेमुळे एसआरके प्रसिद्ध असून यातूनच अनेक कामगिरी त्यांनी बजावल्या आहेत आणि भारतीय व जागतिक दोन्ही बाजारपेठेत आपला व्यावसायिक दबदबा कायम ठेवला आहे.

निस्वार्थ समाज कल्याण

गोविंदकाकांच्या नेतृत्वाखाली एसआरकेने गेल्या सहा दशकांपासून आपल्या निस्वार्थ समाज कल्याण कार्याच्या माध्यमातून हजारो जीवांना नवसंजीवनी दिली आहे. गोविंदकाका यांनी एसआरके नॉलेज फाउंडेशनच्या (एसआरकेकेएफ) रूपात एक सेवाभावी उपक्रम हाती घेतला. एसआरकेकेएफच्या छताखाली अजून तीन ट्रस्ट काम करत आहेत – श्री. रामकृष्ण चेरीटेबल ट्रस्ट, श्री रामकृष्ण वेल्फेअर ट्रस्ट आणि मातोश्री संतोकबा लालजीभाई ढोलकिया चेरीटेबल ट्रस्ट.

विविध शैक्षणिक स्कॉलरशिप

आजवर अंदाजे 3,008,160 पेक्षा जास्त लोकांना विविध शैक्षणिक स्कॉलरशिप आणि वैद्यकीय सहाय्यतेच्या रुपात आर्थिक मदत मिळाली आहे. गोविंदकाका यांनी आपली आई श्रीमती संतोकबा यांच्या स्मरणार्थ आणि आदराप्रित्यर्थ 2006 साली ‘संतोकबा मानवतावादी पुरस्कार’ सुरु केला. आजवर ह्या सन्माननीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील 13 प्रसिद्ध व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

श्री रामकृष्ण एक्स्पोर्टस (एसआरके) बद्दल :

गेल्या सहा दशकांपासून श्री रामकृष्ण एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड (एसआरके) ही कंपनी हिरे व्यापार जगतामध्ये आपल्या सुसंस्कृत साधेपणासाठी, पारदर्शकतेसाठी आणि तत्वांसाठी ओळखली जाते. त्यांची जी व्यावसायिक विचारधारा आहे, त्याच जोरावर त्यांनी या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उलटवला आहे आणि ग्राहक सेवेमध्ये नाव कमावले आहे. तांत्रिकदृष्ट्या जगातील सर्वात आधुनिक हिरे व्यापारी म्हणून नावाजलेल्या एसआरके ने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साथीने गुणवत्तापूर्ण व्यापार करण्याचा आपला प्रवास अविरतपणे आजही तसाच सुरू ठेवला आहे.

अत्यंत वेगाने वाढणारी कंपनी

एसआरके ही अत्यंत वेगाने वाढणारी कंपनी आहे. जुलै 2022 पर्यंत त्यांचा व्यवसाय 1.8 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा वाढला असून ह्या संपूर्ण समुहात तब्बल 6000 सदस्यांचा हातभार आहे हे विशेष! ह्या कंपनीची सुरत येथे दोन कार्यालये आहेत – एसआरके एम्पायर आणि एसआरके हाऊस, ह्या दोन्ही कार्यालयांना पर्यावरणपूरक इमारतींचा युएसजीबीसी-प्लॅटीनम दर्जा मिळालेला आहे. हिरे व्यापार क्षेत्रातील सर्वात ख्यातनाम कंपनी म्हणून त्यांचे स्थान कायम असून सर्वात जास्त आयएसओ प्रमाणपत्र मिळवण्याचा विक्रम सुद्धा यांच्याच नावावर आहे.
वेबसाईट: https://srk.one/
लिंक्डइन पेज: https://www.linkedin.com/company/shree-ramkrishna-export/
इंस्टाग्राम पेज: https://www.instagram.com/srk.one/

श्री रामकृष्ण नॉलेज फाउंडेशन (एसआरकेकेएफ) बद्दल:

श्री रामकृष्ण नॉलेज फाउंडेशन (एसआरकेकेएफ) ही संस्था मानवतेच्या दृष्टिकोनातून उत्तम भविष्य घडवण्यासाठी कार्यक्षम आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार अशा व्यक्ती आणि समूह घडविण्याकरता कटिबद्ध आहे. ह्या संस्थेचे कार्य सातत्यपूर्ण आणि अविरत सुरु असल्याने मनुष्य जातीसाठी शाश्वत भविष्य निर्मितीसाठी त्यांच्या प्रयत्नांची व्याप्ती वाढतच आहे.

उत्तम शिक्षण, आरोग्यसेवा आणि स्वच्छता, कौशल्य विकास, सामाजिक विकास आणि शाश्वत जीवनशैलीची निर्मिती यांसारख्या महत्त्वाच्या ध्येयांवर काम करून एसआरकेकेएफ आपल एक वेगळा ठसा उमटवत आहे. सामाजिक प्रगतीचे हे पाच मुख्य घटकच मनुष्य विकास निर्देशांकाचे मुख्य संकेत दर्शवतात. याशिवाय एसआरकेकेएफ देशाच्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा सदा प्रयत्नशील असते आणि नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन तसेच आपात्कालीन मदत आणि पुनर्वसन तसेच इतर अन्य प्रकल्पांना सर्वतोपरी सहाय्य करते.

वेबसाईट: https://www.srk.foundation/
लिंक्डइन पेज: https://www.linkedin.com/showcase/13597183/admin/
इंस्टाग्राम पेज: https://www.instagram.com/srk_knowledgefoundation/?hl=en

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)