मास्तरांनी तपासले विद्यार्थ्यांचे दप्तर, बॅगमधून निघाले कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या

शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीत विद्यार्थ्यांकडून जे मिळाले ते पाहून सर्वांचेच डोळे चक्रावले.

मास्तरांनी तपासले विद्यार्थ्यांचे दप्तर, बॅगमधून निघाले कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या
विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी (सांकेतिक फोटो)
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 30, 2022 | 2:10 PM

बेंगळुरू,  शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या दप्तरांची (Surprise Bag Checking in school) अचानक तपासणी करण्यात आली. याचा मुलांपेक्षा जास्त धक्का मास्तरांनाच बसला आहे. तपासणीमध्ये या मुलांच्या तप्तरात सिगारेट, लायटर, व्हाइटनर, रोख रक्कम शाळा प्रशासनाला सापडली आहे. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या मुलांच्या बॅगमध्ये कंडोम (Condom), गर्भनिरोधक गोळ्याही (Contraceptive Pills) सापडल्या आहेत. एवढेच नाही तर या मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये दारू आढळून आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील मुलं बॅगमध्ये मोबाईल लपवून आणत असल्याच्या तक्रारी  बेंगळुरूमधील अनेक शाळांमध्ये येत होत्या.  त्यामुळे अनेक शाळांमध्ये मुलांच्या दप्तरांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या मुलांच्या शाळेच्या बॅगची झडती घेतली असता त्यात मोबाईल सापडले, मात्र कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांसारख्या गोष्टी सापडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

मुलांच्या वर्तनात बदल

कर्नाटकातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संबंधित व्यवस्थापनांनीही मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये मोबाइल फोन सापडल्याच्या तक्रारींवरून शाळांना शोध मोहीम राबवण्यास सांगितले होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून शाळेच्या दप्तरांमध्ये धक्कादायक बाबी आढळून आल्यावर शाळांनी विशेष पालक-शिक्षक बैठकीचे आयोजन केले होते. यादरम्यान पालकांनाही हा प्रकार कळला. मुलांच्या वागण्यातही बदल होत असल्याची माहिती पालकांनी दिल्याचे एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

समुपदेशनाची गरज

शाळा प्रशासनाने पालकांना मुलांचे समुपदेशन करण्यास सांगितले आहे. यासाठी मुलांना 10 दिवसांपर्यंत सुटीही देण्यात आली आहे. एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, दहावीच्या विद्यार्थिनीच्या बॅगेत कंडोम सापडला आहे. याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली की ती खाजगी शिकवणीत शिकायला जाते. तिथे इतर मित्र-मैत्रिणींनी तिच्या बॅगमध्ये कंडोम ठेवले असे ती म्हणाली.  दुसरीकडे, कर्नाटकातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या असोसिएटेड मॅनेजमेंटचे सरचिटणीस डी शशी कुमार यांनी म्हटले आहे की 80 टक्के शाळांमध्ये अशी शोध मोहीम राबवण्यात आली आहे. मुलाच्या दप्तरात  गर्भनिरोधक गोळ्या म्हणजेच ipil देखील सापडल्या आहेत. यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतही दारू सापडली आहे. नवीन पिढीचे कारनामे पालकांसाठी टोक्याला ताप ठरत आहे.