आज पॅड मागितले, उद्या कंडोम मागाल… IAS अधिकाऱ्यानं मूर्खात काढलं, पण तिचं एक पाऊल, अनेकांचे डोळे लख्ख उघडणारं ठरलं…

मासिक पाळी आणि त्या दरम्यान आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींविषयी मुलींनी खुलेपणानं बोललं पाहिजे. पाटण्याच्या या मुलीने हे करून दाखवलं. म्हणून तिच्या धाडसाला सलाम....

आज पॅड मागितले, उद्या कंडोम मागाल... IAS अधिकाऱ्यानं मूर्खात काढलं, पण तिचं एक पाऊल, अनेकांचे डोळे लख्ख उघडणारं ठरलं...
रिया कुमारीImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 10:10 AM

पाटणाः एखादं धाडसी वक्तव्य किंवा धाडसी पाऊल उचलणाऱ्यांना अनेकदा मूर्खात काढलं जातं. पण या पावलाची सकारात्मकतेनं (Positivity) दखल घेणारेही लोक असतात. हाच दाखला बिहारमध्ये (Bihar sanitary pad) घडलेल्या एका घटनेनं मिळाला. एका विद्यार्थिनीने  भर कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नावर साध्या सुध्या नाही तर आयएएस (IAS)अधिकाऱ्याने  तिला झापलं. तिची मागणी किती अवाजवी आहे, हे सांगितलं.. पण तिनं सांगितलेलं वास्तव अनेकांचे डोळे उघडणारं ठरलं…

हा किस्सा आहे. 27 सप्टेंबरचा. पाटण्याचा. तिथं युनिसेफचा कार्यक्रम होता. सशक्त बेटी समृद्ध बिहार.. असा. विविध घटकांसाठी एका राज्यस्तरीय कार्यशाळा सुरु होती. एक विद्यार्थिनी उभी राहिली. म्हणाली, गणवेश आणि शिष्यवृत्तीप्रमाणेच आपण मुलींना महिन्याला 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकत नाहीत का?

तिच्या या प्रश्नाला उत्तर दिलं बिहराच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील महिलाच अधिकाऱ्यानं वेड्यातच काढलं. म्हणाल्या, सॅनिटरी पॅड देऊ शकतो. उद्या जिन्स पँट देऊ शकतो. परवा सुंदर बूट देऊ शकतो…. अजून काही देता येईल. पण कुटुंब नियोजनाचा विषय आला तर कंडोमही मोफत द्यावं लागेल… हो नं..?

यानंतरही मुलीने काही प्रतिप्रश्न विचारले. अधिकाऱ्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने उत्तरं दिली.

बिहारच्या आयएएस अधिकाऱ्यानं दिलेलं हे उत्तर सोशल मीडियावर चांगलंच गाजलं. अनेकांनी या अधिकाऱ्यावर येथेच्छ टीकेचा वर्षाव केला.

राष्ट्रीय महिला आयोगाने अशा प्रकारे असंवेदनशील वर्तणुकीबद्दल महिला अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरण मागितलंय.

पहा IAS अधिकाऱ्याने दिलेली बेजबाबदार उत्तरं…

बिहारच्या या कार्यक्रमातून चर्चेत आलेल्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या कंपन्यांनी तिची दखल घेतली.

यापैकीच एका पॅन हेल्थकेअर कंपनीचे सीईओ चिराग पॅन म्हणाले, या मुलींचं हे पाऊल धाडसी आहे. या मुद्द्यावर खरोखरच व्यापक चर्चा झाली पाहिजे.

रिया म्हणाली, मी पॅड विकत घेऊ शकते, पण देशातील असंख्य मुली विकत घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी मी ही मागणी केली होती.

दरम्यान, पॅन हेल्थकेअर कंपनीच्या सीईओंनी या रियाच्या धाडसाचं कौतुक केलं. तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च कंपनीतर्फे केला जाईल, अशी घोषणा केली आहे.

मासिक पाळी आणि त्या दरम्यान आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींविषयी मुलींनी खुलेपणानं बोललं पाहिजे. पाटण्याच्या या मुलीने हे करून दाखवलं. म्हणून तिच्या धाडसाला सलाम….

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.