थलपती विजय यांच्या त्या कृतीने जिंकली हजारो मनं…व्हीआयपी संस्कृतीला जोरदार चाप… खुर्चीवरील टॉवेल…

Thalapathay Vijay Acts wins hearts: थलपती विजय यांच्या त्या कृतीची राज्यातच नाही तर देशभरात एकच चर्चा होत आहे. मुख्यमंत्री विजय यांनी व्हीआयपी संस्कृतीला जोरदार चाप लावला. त्याच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

थलपती विजय यांच्या त्या कृतीने जिंकली हजारो मनं...व्हीआयपी संस्कृतीला जोरदार चाप... खुर्चीवरील टॉवेल...
थलपती विजय, मुख्यमंत्री, तामिळनाडू
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 17, 2026 | 4:49 PM

Thalapathay Vijay removes VIP Towel from his chair: तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या एका कृतीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी या कृतीतून सर्वांसाठी एक मोठा आदर्श घालून दिला. इतकेच नाही तर त्यांनी ब्रिटिश कालीन व्हीआयपी संस्कृतीला चाप बसवला आहे. ब्रिटिश कालीन मानसिकतेतून बाहेर पडण्याचे संकेत त्यांनी या कृतीतून दिले आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक सरकारी कार्यालयात आजही अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर पारंपारिक पांढरा टॉवेल असतो. विजय यांनी त्यांच्या खुर्चीवरील हा टॉवेल अगोदर हटवला आहे. त्यांच्या धाडसी कृतीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

लिसिप्रीया कांगुजम हिच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद

प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ती लिसिप्रिया कांगुजम यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना याविषयीचे आवाहन केले होते. भारतात सरकार कार्यालयात मंत्री महोदयापासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत टॉवेल संस्कृती मिरवली जाते. ब्रिटिश कालीन टॉवेल संस्कृती ही व्हीआयपी मानसिकतेचे प्रतिक असल्याचे आणि ती बंद करण्याचे आवाहन लिसिप्रिया हिने केले होते. विशेष म्हणजे या ट्वीटच्या 24 तासात विजय यांनी त्यांच्या खुर्चीवरील टॉवेल अगोदर हटवला. स्वतःहून त्यांनी कृती केली आणि आदर्श घालून दिला. विशेष म्हणजे ही कृती त्यांनी कोणताही गाजावाज न करता केली. त्यांनी त्यासाठी कुठलीही घोषणा वा प्रसिद्धी केली नाही. विजय यांच्या या कृतीने अनेकांची मनं जिंकली. मुख्यमंत्र्यांनी केलेला हा बदल शासकीय कार्यक्रमातील काही फोटोत दिसून आला. पूर्वी खूर्चीवरील पांढरा टॉवेल आणि नंतरच्या अनेक शासकीय छायाचित्रात खुर्चीवर टॉवेल नसल्याचे उघड झाले.

सामान्य माणसांचा आवाज ऐकणारा मुख्यमंत्री

या बदलाचे ट्विटही लिसिप्रिया कांगुजम यांनी केले. तिने दोन्ही फोटो ट्वीट करत सामान्य माणसांचा आवाज ऐकणारा मुख्यमंत्री अशा शब्दांत मुख्यमंत्री विजय यांचे आभार मानले. राजकारणातील व्हीआयपी थाट मोडीत काढल्याचे समोर येताच तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर इतर राज्यातील मंत्री, व्हीआयपी लवाजमा घेऊन फिरणाऱ्यांना हा मोठा आदर्श असल्याच्या कमेंट त्या पोस्टवर करण्यात आल्या आहेत. विजय हे या पदावर आल्यापासून त्यांनी धाडसी निर्णय घेतल्याने तामिळनाडूतील जनतेने त्यांना डोक्यावर घेतले आहे.

Follow Us