भारतानं करून दाखवलं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, टॅरिफ लावणाऱ्या ट्रम्प यांना दुहेरी दणका

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं टॅरिफ लावल्यानंतर पहिल्यांदाच मोठं यश भारताच्या हातील लागलं आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतासाठी गुडन्यूज समोर आली असून, डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी दणका बसला आहे.

भारतानं करून दाखवलं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, टॅरिफ लावणाऱ्या ट्रम्प यांना दुहेरी दणका
भारताचा अमेरिकेला मोठा झटका
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2025 | 3:21 PM

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा भारतानं मोठा दणका दिला आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. सध्या अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा मोठा परिणाम होऊ शकतो, भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होता. मात्र आता भारतासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून एक गुडन्यूज समोर आली असून, भारताने हे सर्व अंदाज चुकीचे ठरवले आहेत. हा डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेसाठी मोठा झटका मानण्यात येत आहे. भारत हा आता केवळ आशियाच नाही तर जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. मोठी बातमी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा भारतावर नेमका काय परिणाम झाला? याची आकडेवारी आता समोर आली आहे.

या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा भारताच्या जीडीपीवर कोणताही परिणाम झालेला नाहीये, या उलट भारताची निर्यात कमी होण्याऐवजी वाढल्याचं पहायला मिळत आहे. एसबीआयच्या एका रिपोर्टनुसार जागतिक बाजारामध्ये भारताची निर्यात वाढली असून, निर्यातीमध्ये भारत जागतिक स्थानावर मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये प्रचंड चढ-उतार असताना देखील भारताची निर्यात वाढल्याचं पहायला मिळत आहे. एएनआयच्या एका वृत्तानुसार आर्थिक वर्ष 2025- 26 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये भारताची निर्यात वाढून ती 220 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात हा आकडा 214 बिलियन डॉलर होतो, याचाच अर्थ भारताची निर्यात 2.9 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्त्वाची बातमी म्हणजे भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी ज्या अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला, त्याच अमेरिकेमध्ये भारताची निर्यात पूर्वी पेक्षा अधिक वाढल्याचं आकडेवारीमधून समोर आलं आहे. अमेरिकेसोबतची भारताची निर्यात तब्बल 13 टक्क्यांनी वाढली आहे. भारताची अमेरिकेसोबतच्या निर्यातीमध्ये 45 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे, या रिपोर्टमध्ये असं देखील म्हटलं आहे की, अमेरिका ही भारतासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.

 

Follow Us