आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतासाठी आनंदाची बातमी, भारताच्या व्यापाराला मिळणार नवी चालना, थेट या देशासोबत..
भारत सध्या अनेक देशांसोबत व्यापार करार करताना दिसतोय. त्यामध्येच भारताला अत्यंत मोठे यश मिळाले असून मोठा व्यापार करार करण्यात आला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्याच नक्कीच मदत मिळेल.

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावत मोठा धक्का दिला. मात्र, या टॅरिफनंतरही भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम पडला नाही. भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम पडेल, असे सांगितले जात होते. भारताने अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाल्यानंतर इतर देशांसोबत मुक्त व्यापार करण्यावर भर दिला. हेच नाही तर इतर बाजारपेठांचा शोध घेत लगेचच करार देखील केली. भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावल्यानंतर अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आणि अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली. ते नुकसान भरून काढण्यासाठी खास प्लॅन भारताने तयार केला. भारत-इस्रायल संबंधांना नवीन चालना देण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार करारासाठी (FTA) संदर्भ अटींवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामुळे दोन्ही देशांमधील वाटाघाटींसाठी चौकट तयार झाली. दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारीच्या अमर्याद क्षमता आणि शक्यतांबद्दल वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भाष्य केले. अवीव येथील शिखर परिषदेत बोलताना गोयल म्हणाले की, भारत इस्रायली व्यवसायांसाठी प्रचंड संधी आणि वाव नक्कीच देतो.
भारत आणि इस्रायलमध्ये दरवर्षी 6 अब्ज डॉलर्सचा व्यापार अंदाजा होतो. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढेल आणि त्यांचे व्यावसायिक संबंध मजबूत होतील अशी आशा आहे. भारताने इस्रायलला 178 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात या महिन्यात केली आणि 121 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची आयात केली. भारताने अंदाजे 56.8 दशलक्ष डॉलर्सचा व्यापार केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा थोडासा कमी नक्कीच आहे. मात्र, भविष्यात दोन्ही देशांमध्ये मोठा व्यापार बघायला मिळेल.
कापडे, कृषी उत्पादने, मौल्यवान दगड, मोती, ऑटोमोटिव्ह डिझेल अभियांत्रिकी भारत इस्त्रायलला निर्यात करतो. या व्यापार करारामुळे भारतीय व्यापाऱ्यांना इस्रायली बाजारपेठेत प्रवेश मिळण्यास मदत होईल. हा अत्यंत मोठा करार नक्कीच म्हणावा लागेल. भारताने फक्त इस्रायलच नाही तर अनेक देशांसोबत मोठे व्यापार करार केली आहेत. रशियानेही भारतीय वस्तूंची त्यांच्या बाजारपेठेत स्वागत केले आहे.
