Thalapathy Vijay : थलपती विजय यांना तरुणाईचा पाठिंबा मिळण्यामागचं सर्वांत मोठं कारण समोर; तामिळनाडूमध्ये अशी मारली मुसंडी
अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे TVK चे अध्यक्ष थलपती विजय, यांना तामिळनाडूत मिळालेल्या यशाची देशभरात चर्चा आहे. पक्ष स्थापनेपासून अवघ्या 2 वर्षांत त्यांनी विधनासभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला.

Thalapathy Vijay : तामिळनाडू विधानसभेसाठी पहिल्यांदाच निवडणूक लढवत अशतानाही दणदणीत कामगिरी करणारे आणि अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेणारे तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाचे प्रमुख म्हणजे थलपती विजय. पारंपारिक पद्धतीने निवडमूक प्रचार करणं सोडून त्यांनी नव्या युगाचा आवाज ऐकत डिजीटल कँपेन चालवलं. सोशल मीडिया, AI आणि फॅन नेटवर्क्समुळे ही रणनीती वेगाने पसरली. थलपती विजय यांच्या या डिजिटल अप्रोचमुळे तरुणाई आणि विशेषतः अनेक कुटुंबे पक्षाशी थेट जोडली गेली. यामुळेच नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, टीव्हीकेने तामिळनाडू विधानसभा निवडमुकीत घवघवीत यश मिळवलं.
फॅन क्लब बनले डिजीटल वॉरियर्स
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, थलपती विजय यांनी आपल्या जवळपास 85 हजार फॅन क्लब्सचं डिजिटल वॉरियर्स रूपांतर केलं. या व्यक्तींनी सोशल मीडियावर मायक्रो-इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत पक्षाचा संदेश वेगाने पसरवला. या नेटवर्कने निवडणूक प्रचार हा प्रत्यक्ष जमिनीवरून मोबाईल स्क्रीनवर आणला. प्रत्येक भागात स्थानिक पातळीवर कंटेट तयार करण्यात आला, ज्यामुळे लोकांना त्यांच्या सभोवतालच्या परिसराशी जोडले गेल्याची भावना मिळाली. या संपूर्ण रणनीतीचे वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही एका सेंट्रल सिस्टीमवर अवलंबून नव्हती. ती पुढे नेण्यासाठी हजारो लहान नेटवर्क्स एकत्र काम करत होते.
AI, होलोग्राम आणि व्हायरल कंटेंटने माहोल तयार
या कँपेनमध्ये टेक्नोलॉजीचा भरपूर वापर झाला. होलोग्राम रॅली, AI निर्मित व्हिडिओ आणि व्हर्च्युअल मेसेजिंगच्या माध्यमातून विजय यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली. सोशल मीडियावर व्हायरल रील्स आणि छोटे मेसेज वेगाने पसरले, ज्यामुळे ते समजायला आणि शेअर करायला सोपे झाले. मुख्य गोष्ट अशी की, हा कंटेंट खूप आशयाचा, धोरणात्मक नव्हे तर भावनिक आणि लोकांना जोडणारा अशा प्रकारे तयार केला होता. या दृष्टिकोनामुळे युजर्सचे लक्ष जास्त वेळ टिकून राहिलं. ही पद्धत जलद स्क्रोल करणाऱ्या प्रेक्षकांसाठी अनुकूल होती आणि त्यामुळे निवडणुकीचे वातावरण सतत तापलेलं राहिलं.
यूथ त्सुनामी आणि कुटुंबांशी थेट संपर्क
मोहिमेच्या अंतिम टप्प्यात, विजय यांनी ‘युथ सुनामी’ ही घोषणा सुरू केली, जी तरुण, तसेच मुले आणि कुटुंबांना खूप भावली. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले, ज्यात तरुण आपल्या कुटुंबांना त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत होते. या प्रकारचं पीआर ड्रिव्हन कम्युनिकेशन हे पारंपरिक प्रचारापेक्षा वेगळं होतं, कारण त्यामुळे लोकांना स्वतः मेसेजचा भाग बनण्याची संधी मिळाली. विशेषतः महिलांचा सहभाग वाढला, जे या मोहिमेचं मोठं यश मानलं जातंय. आता निवडणुका केवळ भाषणांनीच नव्हे, तर डिजिटल संपर्कांद्वारेही जिंकता येता हे या संपूर्ण रणनीतीने हे दाखवून दिलं.